जगातील सर्वात मोठे मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये अनेक नवीन फिचर्स अॅड केले आहेत. व्हॉट्सएपने गेल्या आठवड्यात Always म्यूट बटण, न्यू स्टोरेज यूसेज आणि कॅटलॉग शॉर्टकट यासारखे खास फिचर्स ग्राहकांसाठी आणले होते. आता व्हॉट्सअॅपवर लवकरच काही नवीन फीचर्स येत आहेत. WABetaInfo च्या वृत्तानुसार, व्हॉट्सअॅप त्याच्या अँड्रॉइड अॅपसाठी नवीन अॅनिमेटेड स्टिकर पॅक जाहीर करत आहे.
या स्टिकर पॅक फिचर्सचे नाव बेबी शार्क (Baby Shark) असं आहे. जे आकाराने 3.4MB असेल. नवीन स्टिकर पॅकव्यतिरिक्त अॅपवर लवकरच स्टिकर सर्च फिचर्सदेखील असणार आहे. या फिचरच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना जीआयएफ फाइल्सप्रमाणे व्हॉट्अॅपमध्ये स्टिकर्स शोधण्याची सुविधा उपलब्ध होईल. (हेही वाचा - WhatsApp Images आणि Videos मुळे फोन मेमरी फुल होतेय? 'या' टेक टिप्स येतील कामी)
प्राप्त माहितीनुसार, व्हॉट्सअॅपने निवडक वापरकर्त्यांसाठी हे फिचर्स जाहीर केले आहे. यूजर्सला लवकरचं त्यांच्या व्हॉट्सअॅपमध्ये स्टिकर पर्यायामध्ये एक नवीन शोध चिन्ह दिसेल. काही दिवसात सर्व वापरकर्त्यांना या पर्यायाचा वापर करता येईल. त्यामुळे ग्राहकांना व्हॉट्सअॅप वापरणं अधिक सोईचं होणार असून विविध प्रकारे स्टिकर अॅड झाल्याने चॅटिंगची मज्जा वाढणार आहे.
या सर्वा व्यतिरिक्त व्हॉट्सअॅपमध्ये एक नवीन इन-अॅप सपोर्ट फीचरसुद्धा येत आहे. या माध्यमातून वापरकर्ते व्हॉट्सअॅप चॅटद्वारे व्हॉट्सअॅपच्या अधिकृत सपोर्ट टीमकडून थेट संवाद साधू शकतील. WhatsApp Support Chat एक व्हेरिफाइड चॅट असेल आणि इतर चॅटप्रमाणे यात एंड-टू-एंड इनक्रिप्शनची सुविधादेखील असणार आहे.