Cyber Crime (फोटो सौजन्य - Pixabay)

Fake Voicemail Fraud: सध्या डिजिटल जगात घरबसल्या अनेक गोष्टी करणे सोपे झाले आहे. परंतु, दुसरीकडे हॅकर्स (Hackers) दिवसेंदिवस नवनवीन मार्गाने लोकांची फसवणूक करत आहेत. आजकाल, सायबर गुन्हेगारांनी लोकांना लुटण्याचा आणखी एक नवीन मार्ग शोधला आहे. बनावट व्हॉइसमेलद्वारे (Fake Voicemail) लोकांना लुटण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका अहवालानुसार, गेल्या दोन आठवड्यांत अशा 1000 हून अधिक सायबर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. व्हॉइसमेल व्यतिरिक्त सायबर गुन्हेगार क्यूआर कोडच्या माध्यमातूनही लोकांना टार्गेट करत आहेत.

हॅकरेडच्या अहवालानुसार, सायबर गुन्हेगार व्हॉइसमेल प्लेबॅकमध्ये कॉर्पोरेट फोन सिस्टमशी कनेक्ट केलेल्या ईमेलमध्ये बनावट आणि दुर्भावनापूर्ण लिंक्स एम्बेड करून लोकांना लक्ष्य करत आहेत. ते लोकांना बनावट व्हॉइसमेलसह ईमेल पाठवले जात आहेत. तथापि, या मेलमध्ये कोणताही व्हॉइसमेल नसून एक लिंक आहे, ज्यावर क्लिक केल्यास तुमचे बँक खाते रिकामे केले जाऊ शकते. (हेही वाचा -Cyber Fraud in India: गेल्या वर्षी सायबर फसवणुकीमुळे भारतीयांचे 7,488.6 कोटी रुपयांचे नुकसान; यादीत महाराष्ट्र अव्वल)

हॅकर्स या नव्या ट्रिकद्वारे लोकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. लोक याला महत्त्वाचा व्हॉइसमेल मानतात आणि लिंकवर क्लिक करतात, त्यानंतर हॅकर्सना वापरकर्त्याच्या संगणक प्रणालीमध्ये प्रवेश मिळतो. असे मेल पाठवण्यासाठी हॅकर्स सोशल मीडियाची मदत घेतात. (हेही वाचा -Cyber Crimes in Mumbai: मुंबईत 2023 मध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ; पोलीस अहवालात समोर आली माहिती)

हॅकर्सपासून वाचण्यासाठी 'हे' करा -

स्कॅमर्सनी पाठवलेले QR कोड स्क्वेअर, पेमेंट प्रोसेसर सेवेसारखे दिसतात. तथापि, हा एक प्रकारचा सापळा आहे ज्यामध्ये लोक सहजपणे अडकतात. हॅकर्सनी पाठवलेल्या ई-मेलच्या विषय ओळीत एक फोन नंबर असतो, जो गुगलवर शोधल्यावर खरा दिसेल. या मेलमध्ये पाठवलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर, वापरकर्ता क्रेडेन्शियल्स पृष्ठावर पोहोचतो.

  • असे घोटाळे टाळण्यासाठी वापरकर्त्यांना ई-मेलमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करणे टाळावे लागेल.
  • याशिवाय, तुम्हाला तुमचे ई-मेल खाते सुरक्षित ठेवण्यासाठी उच्च स्तरीय सुरक्षा सक्रिय करावी लागेल.
  • सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या ब्रँडच्या नावाने वापरकर्त्यांना बनावट ई-मेल पाठवतात. त्यामुळे अशा मेलची व्यवस्थित तपासणी करा.

तथारी, ई-मेल आयडीमध्ये अधिकृत ब्रँड डोमेन नसेल, तर अशा ई-मेलकडे दुर्लक्ष करा.