Cyber Crimes in Mumbai: मुंबईमधील सायबर गुन्ह्यांमध्ये (Cyber Crimes) मोठी वाढ झाली आहे. फिशिंग/एमआयएम अटॅक/स्पूफिंग मेल, बनावट सोशल मीडिया प्रोफाइल/मॉर्फिंग ईमेल/एसएमएस, जॉब फ्रॉड, इन्शुरन्स/प्रॉव्हिडंट फंड फ्रॉड, बनावट वेबसाइट्स, क्रिप्टो-चलन फसवणूक आणि गुंतवणूक फसवणूक यासारख्या सायबर गुन्ह्यांमध्ये, 2022 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तुलनेत गेल्या वर्षी लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. आकडेवारीनुसार, 2022 मध्ये 4723 गुन्ह्यांच्या तुलनेत गेल्या वर्षी 4169 सायबर-गुन्ह्यांची नोंद झाली होती. मात्र सायबर-गुन्ह्यांशी संबंधित फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे, गेल्या वर्षी 2212 गुन्हे दाखल झाले आहेत, तर 2022 मध्ये 2175 प्रकरणे नोंदवली गेली. गेल्या वर्षी नोंदवलेल्या 4169 गुन्ह्यांपैकी 938 गुन्हे उघडकीस आले असून 1090 जणांना अटक करण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)