Vodafone (Photo Credits:Twitter)

आज तंत्रज्ञान क्षेत्रात एवढी प्रगती झाली आहे की आता तुम्ही प्रत्येक क्षणी कॉल्स आणि व्हिडीओद्वारे तुमच्या प्रियजनांशी कनेक्ट राहता. पण जेव्हा स्मार्टफोन आला नव्हता, तेव्हा लोक सध्या फोनवर कॉल आणि मेसेजिंगद्वारेच कनेक्ट होत असत. पण आता तुमच्यापैकी बरेच जण असे असतील ज्यांनी बऱ्याच काळापासून मेसेज केला नसेल. सध्याच्या काळात त्याची गरज वाटत नाही. अशा परिस्थितीत सध्या जगातील पहिल्या संदेशाची म्हणजेच एसएमसीची खूप चर्चा आहे. हा एसएमएस 30 वर्षांपूर्वी पाठवला होता व आता त्याचा लिलाव होत आहे.

हा एसएमएस 3 डिसेंबर 1992 मध्ये व्होडाफोनच्या एका कर्मचाऱ्याने दुसऱ्याला पाठवला होता. ब्रिटिश प्रोग्रामर नील पापवर्थ असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. 30 वर्षांपूर्वी पाठवलेल्या या पहिल्या टेक्स्ट मेसेजमध्ये 'मेरी ख्रिसमस' असे लिहिले होते, म्हणजेच यामध्ये ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. आता या एसएमएसचा लिलाव 100,000 ते 200,000 पौंड (जवळपास 1 ते 2 कोटी रुपये) मध्ये होऊ शकतो. हा लिलाव पॅरिसमधील अगाट्स ऑक्सन हाऊसमध्ये होणार आहे. जगभरातील लोक यामध्ये बोली लावू शकतील. आज दुपारी 3 वाजता लिलाव सुरू होणार आहे.

'मेरी ख्रिसमस'मध्ये एकूण 14 शब्द आहेत. या एसएमएसचा 2 कोटी रुपयांना लिलाव झाला असे गृहीत धरले तर प्रत्येक अक्षराची किंमत सुमारे 14.29 लाख रुपये असेल. हा एसएमएस ऑर्बिटल 901 हँडसेटवर पाठवण्यात आला होता. नीलने 2017 मध्ये सांगितले होते की, जेव्हा त्याने 1992 मध्ये एसएमएस पाठवला तेव्हा तो इतका लोकप्रिय होईल हे माहित नव्हते. (हेही वाचा: Tesla Baby: महिलेने टेस्ला इलेक्ट्रिक कारच्या पुढच्या सीटवर दिला बाळाला जन्म; ओळखले गेले 'टेस्ला बेबी')

व्होडाफोनने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या एसएमएसच्या लिलावातून जे काही पैसे मिळतील, ते यूनायटेड नेशन हाय कमिशनर फॉर रिफ्यूजी (UNHCR) दिले जातील. ही संयुक्त राष्ट्रांची निर्वासितांसाठी असलेली संस्था आहे. दरम्यान, जेव्हा 1992 मध्ये पहिला संदेश पाठवला गेला तेव्हा 1995 पर्यंत, दर महिन्याला सरासरी केवळ 0.4 टक्के लोक संदेश पाठवत होते.