Titanic Props Auction: 'टायटॅनिक' (Titanic) हा चित्रपट आजही जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक समजला जातो. 19 डिसेंबर 1997 रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाची जादू अजूनही कायम आहे. जेम्स कॅमेरॉन दिग्दर्शित 'टायटॅनिक'मधील रोझ आणि जॅकची प्रेमकथा प्रेक्षकांना इतकी भावली होती की, हा चित्रपट जेव्हा दुसऱ्यांदा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला तेव्हा त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. चित्रपटाच्या शेवटी जॅकचा होणारा मृत्यू आजही चाहत्यांना सहन होत नाही. आता नुकतेच 'टायटॅनिक' चित्रपटामधील काही प्रॉप्स विक्रीसाठी ठेवण्यात आले होते, ज्यांची कोट्यावधी रुपयांना विक्री झाली आहे.
तर 'टायटॅनिक' सिनेमाच्या शेवटी नायिका रोझ पाण्यातून बाहेर पडण्यासाठी एका लाकडी फळीचा किंवा दरवाजाचा आधार घेताना दिसत आहे. हा दरवाजाही लिलावासाठी ठेवण्यात आला होता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या लाकडी दरवाजाचा 6 कोटी रुपयांना लिलाव झाला आहे. टाईमच्या वृत्तानुसार, 'टायटॅनिक'च्या एका सुपर फॅनने हा लाकडी दरवाजा 718,750 दशलक्ष डॉलर्स (6 कोटी रुपये) मध्ये विकत घेतला आहे.
सीएनएनच्या रिपोर्टनुसार, प्रॉपचा हा प्रसिद्ध तुकडा पहिल्यांदा ऑर्लँडो, फ्लोरिडा येथील प्लॅनेट हॉलीवूड येथे प्रदर्शित करण्यात आला होता, ज्यापूर्वी तो दोन दशकांहून अधिक काळ हेरिटेज ऑक्शन्सच्या संग्रहात होता. आता पाच दिवस चाललेल्या या लिलावामध्ये विविध चित्रपटांमधील प्रॉप्सच्या विक्रीद्वारे $15.7 दशलक्ष गोळा केले गेले. यामध्ये टायटॅनिकच्या लाकडी फळीने सर्वोत्तम कामगिरी केली. (हेही वाचा: Rupert Murdoch Set to Marry at 92: मीडिया टायकून रुपर्ट मर्डोक वयाच्या 92 व्या वर्षी 5 व्यांदा अडकणार विवाहबंधनात, Elena Zhukova शी बांधणार लग्नगाठ; जाणून घ्या त्यांच्या पूर्वाश्रमीच्या 4 पत्नींबाबत)
View this post on Instagram
टोबी मॅग्वायरने परिधान केलेला स्पायडरमॅन सूट $125,000 मध्ये विकला गेला. या लिलावामध्ये 'टायटॅनिक'चे इतर अनेक प्रॉप्सही विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. यामध्ये रोझच्या पेस्टल शिफॉन इव्हनिंग गाउनचाही समावेश होता, जो जहाज बुडताना तिने परिधान केला होता. दरम्यान, हेरिटेज ऑक्शन्स मोठ-मोठ्या संग्रहणीयांची विस्तृत श्रेणी हाताळते. आता रविवारी संध्याकाळी संपलेल्या लिलावामध्ये $15.68 दशलक्ष गोळा केले गेले.