Airtel (PC - Twitter/ANI)

Bharti Airtel International Roaming Packs: दूरसंचार सेवा प्रदाता भारती एअरटेलने (Bharti Airtel) परदेशात प्रवास करणाऱ्या ग्राहकांसाठी परवडणारे आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅक (International Roaming Packs) लॉन्च केले आहेत. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, नवीन पॅकचा 184 देशांमध्ये वापर केला जाऊ शकतो आणि त्यांचे दर 133 रुपये प्रतिदिन पासून सुरू होतात. इतक्या कमी दरामुळे ते परदेशात उपलब्ध असलेल्या स्थानिक सिमपेक्षा अधिक परवडणारे पर्याय बनतात. याव्यतिरिक्त, या पॅकमध्ये अमर्यादित डेटा, डेटा बेनिफिट्स, व्हॉईस कॉलिंग, इन-फ्लाइट कनेक्टिव्हिटीदेखील समाविष्ट आहे.

या पॅकमुळे प्रवाशांना फ्लाइट दरम्यान कॉल करणे, संदेश पाठवणे आणि इंटरनेट वापरणे शक्य होते. एअरटेलने हे देखील सुनिश्चित केले आहे की, या 184 देशांमध्ये प्रवास करणाऱ्या ग्राहकांना यापुढे वेगवेगळ्या देशांसाठी वेगवेगळे पॅक खरेदी करण्याची गरज भासणार नाही. त्यांना फक्त त्यांचा प्रवास कालावधी निवडायचा आहे आणि एकाच पॅकद्वारे ते जगात कुठेही अखंड कनेक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकतात. (हेही वाचा: World's Largest Mobile Operator: मुकेश अंबानी यांच्या Reliance Jio चा नवा विक्रम; चिनी कंपनीला मागे टाकून बनला डेटा ट्रॅफिकच्या बाबतीत जगातील सर्वात मोठा मोबाईल ऑपरेटर)

वापरकर्ते एअरटेल थँक्स ॲपद्वारे प्लॅनचे ऑटो-रिन्यू देखील करू शकतात. वापरकर्ते प्लॅन सर्व्हिस चालू किंवा बंद करू शकतात आणि ॲपद्वारे तुम्ही प्लॅन बदलू शकता. याआधी एअरटेलचे अनेक आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन उपलब्ध होते. नवीन प्लान व्यतिरिक्त कंपनीचे एकूण 4 प्लान आहेत. नवीन आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅक आता 130 रुपयांपासून सुरू होईल आणि 2997 रुपयांपर्यंत जाईल. सर्वात महागड्या पॅकमध्ये ग्राहकांना 365 दिवसांची वैधता मिळेल. यामध्ये 100 मिनिटे व्हॉइस कॉल, 2 जीबी डेटा आणि 20 मेसेजचा लाभ दिला जाणार आहे.