
कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजेंस (Artificial Intelligence) आता अनेकांच्या नोकऱ्यांवर उठले आहे. चॅलेंजर (Challenger), ग्रे (Gray) आणि ख्रिसमसच्या (Christmas) मासिक अहवालात दिलेल्या माहितीनुसार केवळ एआयमुळे यूएसमध्ये तब्बल 4000 कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांनी एआयमुळे नोकरी गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. मे 2023 मध्ये झालेल्या 80,000 पेक्षा अधिक नोकरकपातीमध्ये सुमारे 3,900 नोकऱ्या या एआय (AI) मुळे गेल्या आहेत.
नोकरकपातीमध्ये इतरही काही कारणे समाविष्ठ आहेत. जसे की, बाजारातील स्थिती, आर्थिक परिस्थिती, खर्चात कपात, कंपनीची पूनर्रचना अथवा विलीनीकरण आणि अधिग्रहण यांसारख्या बाबींचाही त्यात समावेश होतो. AI मुळे नोकरी गमावणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रमाण हे मे 2023 मध्ये झालेल्या एकूण कर्मचारी कपातीच्या 4.9% आहे. हे प्रमाण 2016 पासून आतापर्यंत सर्वाधिक आहे. या वर्षी (2023) जानेवारी ते मे दरम्यान सुमारे 417,500 नोकऱ्या गेल्या. कर्मचारी कपातीची सर्वात वाईट सुरुवात 2020 पासून झाली. कोविड-19 साथीच्या रोगाने मोठ्या प्रमाणावर टाळेबंदी सुरू केली. . (हेही वाचा, आर्टिफॅक्टने नवीन फिचर केले लाँच, आता आर्टिकलची हेडलाइन पुन्हा एडिट करू शकणार क्लिकबेट)
आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेक नोकऱ्या, व्यवसाय मारले जातील. मानवी जीवनपद्धतीवर आणि त्याच्या विचार करण्याच्या क्षमतेरही त्याचा मोठा परिणाम होईल, असा इशारा शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञान उद्योगातील मान्यवरांनी दिला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मशीनद्वारे, विशेषतः संगणक प्रणालीद्वारे मानवी बुद्धिमत्ता प्रक्रियांचे अनुकरण. AI च्या विशिष्ट अनुप्रयोगांमध्ये तज्ञ प्रणाली, नैसर्गिक भाषा प्रक्रिया, उच्चार ओळखणे आणि मशीन दृष्टी यांचा समावेश होतो.
वर्तमान काळात AI प्रचंड चर्चेत असून त्याच्या प्रचाराला मोठा वेग आला आहे. अनेक ठिकाणी एआयचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असून नोकऱ्यांवर गंडातरही आले आहे. बर्याचदा ज्याला AI म्हणून संबोधले जाते तो तंत्रज्ञानाचा फक्त एक घटक असतो. जसे की मशीन लर्निंग. AI ला मशीन लर्निंग अल्गोरिदम लिहिण्यासाठी आणि प्रशिक्षण देण्यासाठी विशेष हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा पाया आवश्यक आहे. कोणतीही एकल प्रोग्रामिंग भाषा AI साठी समानार्थी नाही, परंतु Python, R, Java, C++ आणि Julia मध्ये AI विकसकांमध्ये लोकप्रिय वैशिष्ट्ये आहेत. ज्यामुळे तंत्रज्ञानावर आधारी गोष्टी अधिक वेगाने करता येतात. बौद्धीक क्षेत्रात चांगले काम करता येते.