Microsoft (PC- Wikimedia Commons)

Microsoft मध्ये नोकर कपात होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ज्या कर्मचार्‍यांकडून अपेक्षेप्रमाणे काम झाले नाही त्यांच्यावर आता नोकरी गमावण्याची वेळ येणार आहे. कंपनीकडून सध्या कर्मचार्‍यांची कार्यक्षमता सुधारण्याकडे लक्ष दिले जात असल्याचं सांगण्यात आले आहे. दरम्यान मायक्रोसॉफ्टच्या या लेऑफ मध्ये टेक्नॉलॉजी क्षेत्रात कंपनीच्या स्पर्धात्मक स्थिती राखण्यासाठी कंपनीच्या धोरणाशी सुसंगत काम न करणार्‍यांना आता नारळ दिला जाणार आहे. Business Insider,च्या रिपोर्ट्स नुसार Microsoft कडून नोकऱ्या कपातीची योजना आखली जात आहे आणि अंतर्गत पुनर्रचनेसाठी अपेक्षित कामगिरी न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. टेक जायंट आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये उत्पादकतेतील तफावत दूर करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे लक्ष देऊन मूल्यांकन करत असल्याचे म्हटले जात आहे. मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्याने आगामी नोकरकपातीच्या माहितीची पुष्टी केली आहे.

प्रवक्त्याने नमूद केले की जेव्हा कर्मचारी कामगिरीच्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत तेव्हा योग्य कारवाई केली जाते. त्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून, मायक्रोसॉफ्ट विविध स्तरांवर कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करते, ज्यामध्ये लेव्हल 80 वरील काही वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अहवाल असे सांगण्यात आले आहे की अनेक विभाग, प्रामुख्याने Security Division, या नोकरकपातीमुळे प्रभावित होण्याची अपेक्षा आहे.

Microsoft ने कामगारांच्या नेमक्या किती संख्येने कामगारांना नोकरकपातीचा फटका बसेल यासंबंधी माहिती दिलेली नाही. प्रवक्त्याने सूचित केले की performance-based exits मुळेकाही जागा रिकाम्या झाल्या आहेत, त्यामध्ये काही नवीन लोकांना घेण्यात आले आहे. हे सूचित करते की काही नोकऱ्यांमध्ये कपात केली जाऊ शकते, परंतु मायक्रोसॉफ्टच्या एकूण आकड्यांमध्ये काही लक्षणीय बदल होणार नाहीत. कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची पातळी राखण्यासाठी नवीन टॅलेंटला घेत राहणार आहे.