व्हायरस आणि खतरनाक अॅप सध्या सामान्य बाब झाली आहे. तर अॅप्पल आणि गुगलकडून अशा प्रकारचे अॅप हटवल्यानंतर सुद्धा कधी कधी ते पुन्हा अॅप स्टोरवर दिसून येतात. सायबर सुरक्षा सॉफ्टवेअर प्रदाता अवास्ट (Avast) यांना नुकतेच कळले की, प्रीमियम SMS फसवणूकीच्या योजनेत 151 अॅन्ड्रॉइड अॅपचा समावेश होता. UltimaSMS एक स्कॅम कॅम्पेन होता जो युजर्सला मूल्यवान SMS सेवांसाठी एनरोलमेंट करण्यासाठी बनावट अॅन्ड्रॉइड अॅपचा वापर करत होता.
बनावट अशा 151 अॅप हे 80 हून अधिक देशांत 10.5 मिलिनपेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड केले आहे. कस्टम किबोर्ड, क्यूआर कोड स्कॅनर, व्हिडिओ आणि फोटो एडिटिंग प्रोग्राम, कॉल ब्लॉक आणि गेमसह विविध क्षेत्रातील अॅपने विविध क्षेत्रातील उपकरण असल्याचा दिखावा केला. यामधील प्रत्येक अॅपने एकच पॅटर्नचे पालन केले. लॉन्चिंगनंतर उपयुक्त क्षेत्र कोड आणि भाषा निवडण्यासाठी स्मार्टफोनचे स्थान, IMEI नंबर आणि फोन नंबर वेरिफाय केले जाते.(Netflix ने Android युजर्ससाठी लॉन्च केले नवे '5' गेम्स)
या मॅलिसिस प्रोग्रामने युजर्सचे फोन क्रमांक आणि कधी कधी त्यांचा ईमेल आयडी विचारण्यासाठी संकेतांचा वापर केा होता. युजर्सच्या माहितीशिवाय, त्याचा वापर प्रिमियम एसएमएस सेवांसाठी साइन अप करण्यासाठी केला जातो. हे शुल्क साधारणपणे $40 प्रति महिना किंवा त्याहून अधिक होते. ग्राहकांना लूटल्यानंतर अॅप किंवा काम करणे बंद केले जाते. या व्यतिरिक्त नव्या सब्सक्रिप्शनचे ऑप्शन ही दिले जाते. मुळ मुद्दा असा आहे की, जर एखादा युजर हे प्रोग्राम अनइंस्टॉल जरी करत असेल तर त्याला सदस्यतेचे शुल्क भरावे लागतात. ज्यासाठी त्यांनी साइन अप केले होते.