नेटफ्लिक्स (Netflix) ने मंगळवारी जगभरातील अँड्रॉइड (Android) युजर्ससाठी पाच मोबाईल गेम्स लॉन्च केले आहेत. OTT प्लॅटफॉर्मद्वारे चित्रपट आणि टीव्ही मालिका ऑफर करण्याव्यतिरिक्त नेटफ्लिक्सने आपल्या अँड्रॉइड युजर्ससाठी गेम्स आणले आहेत. या पाच मोबाइल गेम्समध्ये स्ट्रेंजर थिंग्ज: 1984 (Stranger Things: 1984), स्ट्रेंजर थिंग्ज 3: द गेम, शूटिंग हूप्स (Stranger Things 3: The Game, Shooting Hoops) (फ्रॉस्टी पॉप), कार्ड ब्लास्ट (Card Blast) (अमुझो आणि रॉग गेम्स) आणि टीटर अप (Teeter Up) (फ्रॉस्टी पॉप) यांचा समावेश आहे.
मालिका आणि चित्रपट याप्रमाणेच कोणत्याही स्तरासाठी आणि प्रत्येक प्रकारच्या खेळाडूसाठी नेटफ्लिक्सला गेम डिझाईन करायचे आहेत. नवशिक्या किंवा अनुभवी गेमर सुद्धा या गेम्सचा आनंद घेऊ शकतील. (Netflix New Releases: 'नेटफ्लिक्स'वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार नव्या सीरीज आणि चित्रपट, पाहा यादी)
🎮📱 Let the Games Begin📱🎮
Tomorrow, Netflix Games will start rolling out on the Netflix mobile app. First on Android, with iOS on the way.
It’s early days, but we’re excited to start bringing you exclusive games, with no ads, no additional fees and no in-app purchases. pic.twitter.com/ofNGF4b8At
— Netflix Geeked (@NetflixGeeked) November 2, 2021
तुम्ही जर नेटफ्लिक्सचे सबस्क्रायबर असाल तर तुम्ही अॅपमध्ये उपलब्ध असलेल्या गेम्स रो किंवा गेम्स टॅबमधून तुमच्या आवडीचा गेम निवडू शकता. त्यांनतर तुम्हाला गूगल प्ले-स्टोर वर नेण्यात येईल. तिथे तुम्हाला तो गेम डाउनलोड आणि इंस्टाल करण्याचा पर्याय मिळेल. गेम इंस्टाल झाल्यानंतर तो खेळण्यासाठी तुम्हाला तुमच्या नेटफ्लिक्स अकाऊंटचे लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरावे लागतील.
हे गेम एकाच नेटफ्लिक्स अकाऊंटवरून अनेक मोबाईल डिव्हाईसवर तुम्ही खेळू शकता. यासोबतच नेटफ्लिक्स या मोबाईल गेम्ससाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारत नाही. हे गेम्स कोणत्याही जाहिराती देत नाही किंवा अॅप-मधील खरेदी देखील दाखवत नाही. काही गेम्सना इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता असू शकते. तर इतर ऑफलाइन खेळण्यासाठी उपलब्ध असतील. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेटफ्लिक्सने पंजाबी, हिंदी, मराठी, तमिळ आणि बंगाली यासह विविध भाषांमध्ये गेम्स सादर केले आहेत.