Netflix New Releases: 'नेटफ्लिक्स'वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार नव्या सीरीज आणि चित्रपट, पाहा यादी
Netflix logo (Photo credit: twitter)

प्रेक्षक चित्रपटगृहात जाणे पसंत न करता ओटीटी (OTT) वर चित्रपटाची मेजवानी घेत आहे. त्यामुळे  लोक नेटफ्लिक्स (Netflix) आणि प्राइमला (Prime) पसंत करत आहे. नोव्हेंबर मध्ये सध्या अनेक नव्या चित्रपटाचा आणि सीरीजचा वावर पाहायला मिळणार आहे, अनेक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे प्रेक्षकांनमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. सध्या  नेटफ्लिक्सवर या माहिन्यात प्रदर्शित होणारे काही खास चित्रपट पाहूया. (हे ही वाचा Netflix युजर्ससाठी खुशखबर! स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर लवकरच लॉन्च होणार Video Games.)

THE WEDDING GUEST, 1st Nov 

(Photo Credit - Instagaram)

देव पटेलची प्रमुख भूमिका असणारा 'द वेडिंग गेस्ट'  हा चित्रपट 2018 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये अभिनेत्री राधिका आपटेने देखील प्रमुख भूमिका साकारली होती.  आज (1 नोव्हेंबर) हा चित्रपट नेटफ्लिक्स वर प्रदर्शित  झाला आहे.

NARCOS MEXICO, 5 Nov

NARCOS MEXICO (Photo Credit - Instagram)

नार्कोज मेक्सिकोचा नवा सिझन 5 नोव्हेंबर 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. नार्कोज या शोचे फॅन्स या सिझनची उत्सुकतेने वाट पाहात होते.

MEENAKSHI SUNDARESHWAR, 5th Nov

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanya Malhotra💥 (@sanyamalhotra_)

 

अभिनेत्री  सान्या मल्होत्रा 'मीनाक्षी सुंदरेश्वर' हा चित्रपट देखील या माहिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये सान्या  साउथ इंडियन लूकमध्ये दिसणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानी देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

DHAMAKA, 19 Nov 

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

 

अभिनेता कार्तिक आर्यनचा धमाका हा चित्रपट देखील नेटफिक्सवर नोव्हेंबर महिन्यामध्ये 19 तारखेला प्रदर्शित होणार आहे.  कार्तिक या चित्रपटामध्ये अर्जुन पाठक या न्यूज अॅंकरच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राम माधवनी यांनी केले असून निर्मीती रॉनी स्क्रूवाला यांनी केली आहे.