Airtel युजर्ससाठी खुशखबर! 'या' पद्धतीने युजर्सला मिळणार 6GB Data कूपन फ्री
Airtel (Photo Credits: File Image)

एअरटेल (Airtel) युजर्ससाठी एक खास ऑफरची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये प्रीपेड रिचार्ज प्लॅनवर 6 जीबी पर्यंतच्या डेटा कूपनचा लाभ घेता येणार आहे. या डेटाच्या माध्यमातून युजर्सला मनोरंजन आणि महत्वाची कामे करता येणार आहेत. एअरटेलच्या Free Data Coupons मिळवण्यासाटी युजर्सला काही खास करावे लागणार नाही आहे. त्यासाठी फक्त 219 रुपयांच्या सुरुवाती प्रीपेडसह रिचार्ज सोबत आणि रिचार्जवर फ्री कुपन मिळवता येणार आहे.

युजर्सला 6 जीबी पर्यंतचे डेटा कूपन फ्री मिळवता येणार आहे. यासाठी त्यांना हे जाणून घेणे महत्वाचे आहे की, एअरटेलच्या या ऑफरचा लाभ घेण्यासाठी त्यांना काय करावे लागेल आणि कोणत्या रिचार्जवर फ्री कूपन मिळणार आहे. त्याचसोबत ते रिडिम कसे करावे याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.(Vodafone Idea Plan: व्होडाफोन-आयडिया च्या 95 रुपयांच्या रिचार्जवर डेटासह 56 दिवसांची वैधता; जाणून घ्या Vi चे जबरदस्त रिचार्ज प्लान)

कंपनीचे 28 दिवसांच्या येणाऱ्या प्लॅनमध्ये 219, 249, 279, 298, 349, 398 आणि 448 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनचा समावेश केल्यास युजर्सला 1-1GB चे दोन डेटा कूपन फ्री मिळणार आहेत. तर युजर जर 56 दिवसांच्या वॅलिडिटी असणारे 399,449,558 आणि 599 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज करणार असल्यास त्यांना 1-1GB जे 4 कूपन डेटा फ्री मिळणार आहेत. म्हणजेच त्यांना 4 जीबी अधिक डेटा दिला जाणार आहे. या डेटाचा गरजेनुसार वापर करता येणार आहे. एअरटेल युजर्सला 84 दिवसांचा 598 आणि 698 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन मध्ये युजर्सला 1-1GB चे असे 6 डेटा कूपन फ्री मिळणार आहेत.

त्यामुळे जसे वर दिल्याप्रमाणे रिचार्ज केल्यास त्यांच्या अकाउंट मधून डेटा कूपन क्रेटिड होणार आहे. एअरटेलच्या युजर्ससाठी आणखी एक मुख्य गोष्ट म्हणजे जे अॅपच्या माध्यमातून रिजार्ज करणार नाहीत त्यांना याचा लाभ घेता येणार नाही आहे. त्यासाठी युजर्सला एअरटेलचे थँक्स अप अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. यामध्ये My Coupons मध्ये जाऊन युजर्सला डेटा रिडिम करता येणार आहे. तेथे कुपनच्या वॅलिडिटी बद्दल सुद्धा कळणार आहे.