Vodafone Idea Plan: व्होडाफोन-आयडिया च्या 95 रुपयांच्या रिचार्जवर डेटासह 56 दिवसांची वैधता; जाणून घ्या Vi चे जबरदस्त रिचार्ज प्लान
Vodafone Idea Merger Representational Asset (Photo Credit: TheIndianWire)

Vodafone Idea Plan: व्होडाफोन आयडिया आपल्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन वेगवेगळे प्लान ऑफर करत असते. व्होडाफोन आयडियाकडे असे काही प्लान आहेत जे रिलायन्स जिओ आणि एअरटेलकडेही नाहीत. आज आम्ही अशाच एका प्लानबद्दल सांगत आहोत, ज्याची किंमत 95 रुपये आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना डेटासह 56 दिवसांची वैधता दिली जात आहे. चला यासंबंधी अधिक माहिती जाणून घेऊयात...

Vi का 95 रुपयांचा प्लान -

कंपनीने या प्लानला सेव्हिंग पॅक असं नाव दिलं आहे. व्होडाफोन-आयडियाची हा प्रीपेड प्लान त्यांच्यासाठी खास आहे, ज्यांना खूप कॉलिंग आणि डेटाची आवश्यकता नाही. परंतु, त्यांना कमी किंमतीत दीर्घ वैधता हवी आहे. या योजनेत वापरकर्त्यांना कॉल करण्यासाठी 74 रुपयांचा टॉकटाईम दिला जातो. स्थानिक आणि राष्ट्रीय कॉलिंगसाठी, वापरकर्त्यांकडून 2.5 पैसे / सेकंद शुल्क आकारले जाते. याशिवाय या प्लानमध्ये 200MB डेटादेखील देण्यात आला आहे. योजनेची वैधता 56 दिवसांची आहे. योजनेत इतर कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाहीत. (वाचा - BSNL कडून मोठी ऑफर; आता 109 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना मिळणार डबल डेटा आणि इतर काही खास फायदे)

Vi ची 49 रुपयांचा प्लान -

अशाच काही वैशिष्ट्यांसह कंपनी आणखी एक प्लान ऑफर करते. हा प्लान 49 रुपयांचा आहे. या प्लानची वैशिष्ट्य मुख्यत्वे 95 रुपयांच्या प्लानसारखेचं आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना 28 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. यामध्ये कॉल करण्यासाठी 38 रुपयांचा टॉकटाईम दिला जातो. स्थानिक आणि राष्ट्रीय कॉलिंगसाठी, वापरकर्त्यांकडून 2.5 पैसे / सेकंद शुल्क आकारले जाते. इंटरनेटसाठी 300MB डेटा देखील प्रदान केला जातो.

एअरटेलचा 79 रुपयांचा प्लान -

एअरटेलदेखील असाच एक प्लॅन ऑफर करत आहे. याची किंमत 79 रुपये आहे. या प्लानमध्ये 64 रुपये आणि 200 एमबी डेटाचा टॉकटाइम देण्यात आला आहे. मात्र, एअरटेलच्या या योजनेत केवळ 28 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. स्थानिक आणि एसटीडी कॉलसाठी, वापरकर्त्यांकडून 60 पैसे / मिनिट शुल्क आकारले जाते.