BSNL कडून मोठी ऑफर; आता 109 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना मिळणार डबल डेटा आणि इतर काही खास फायदे
BSNL (Photo Credit: Livemint)

सरकारी दूरसंचार कंपनी BSNL आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्याच्या बाबतीत मागे नाही. म्हणूनचं कंपनी येत्या काही दिवसात आपल्या ग्राहकांना नवीन योजना आणि ऑफर देत आहे. अलीकडे बीएसएनएलने आपल्या काही प्लानमध्ये बदल केला होता. बीएसएनएलच्या एका लोकप्रिय योजनेचा डेटा दुप्पट करण्यात आला आहे. आता वापरकर्ते 109 रुपयांच्या प्लानतर्गत डबल डेटा वापरू शकतात. पूर्वी या प्लानमध्ये 5 जीबी डेटा मिळत असे, परंतु आता वापरकर्त्यांना 10 जीबी डेटा मिळणार आहे.

109 रुपयांचा प्लान -

बीएसएनएलने जाहीर केले आहे की, आता 109 रुपयांच्या स्वस्त प्रीपेड प्लानमध्ये वापरकर्ते डबल डेटाचा लाभ घेऊ शकतात. अहवालानुसार, या योजनेतील ग्राहकांना 31 मार्चपर्यंत डबल डेटा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेत पूर्वी वापरकर्त्यांना फक्त 5 जीबी डेटा मिळायचा. परंतु, डबल डेटाच्या घोषणेनंतर ग्राहकांना 10 जीबी डेटा देण्यात येत आहे. (वाचा - खुशखबर! BSNL ने आणला 147 रुपयांचा नवा प्रीपेड प्लान; सोबतच 'या' दोन प्लान्सची वाढवली वैधता)

प्लानमध्ये विशेष बदल -

109 रुपयांच्या प्लानची वैधता पूर्वी केवळ 20 दिवसांसाठी होती. परंतु आता या योजनेची वैधता 75 दिवसांपर्यंत वाढविण्यात आली आहे. म्हणजेचं आता वापरकर्ते 75 दिवस या योजनेचा वापर करू शकतात. कंपनीने आपला डेटा तसेच वैधता वाढविली आहे.

बीएसएनएलच्या 109 रुपयांच्या प्लानमध्ये वापरकर्ते अमर्यादित कॉलिंगची सुविधेचादेखील लाभ घेऊ शकतात. ही योजना विशेषतः अशा लोकांसाठी उपयुक्त आहे, ज्यांना सध्याचा प्लान सक्रिय ठेवायचा आहे.

दरम्यान, बीएसएनएलने अलीकडेचं आपल्या वापरकर्त्यांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी BSNL Cinema Plus सेवा सुरू केली. या सेवेअंतर्गत, वापरकर्त्यांना एकाधिक ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळू शकेल. यासाठी ग्राहकांना दरमहा 199 रुपये शुल्क भरावे लागेल.