खुशखबर! BSNL ने आणला 147 रुपयांचा नवा प्रीपेड प्लान; सोबतच 'या' दोन प्लान्सची वाढवली वैधता
BSNL (Photo Credit: Livemint)

टेलिकॉम कंपनी BSNL ने आपल्या चाहत्यांसाठी एक जबरदस्त प्रीपेड प्लान आणला आहे. 147 रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये 30 दिवसांची वैधता मिळत आहे. त्यासोबतच यात अनलिमिटेड कॉल्स (Unlimited Calls) आणि 10GB चा हाय स्पीड डाटा सुद्धा मिळत आहे. यासोबतच या कंपनीने आणखी एक घोषणा केली आहे. ज्यात 247 आणि 1999 रुपयांच्या प्रीपेड प्लानची  (Prepaid Plan) वैधता वाढवली आहे. यासोबतच काही प्लान्समध्ये Eros Now चे सब्सक्रिप्शन प्लानसुद्धा जोडला आहे.

BSNL च्या 147 रुपयाच्या प्रीपेड प्लानबद्दल बोलायचे झाले तर, यात अनलिमिटेड कॉल्स आणि एसटीडी व्हॉईस कॉल देण्यात आले आहे. यात डेली FUP 250 मिनिटांची आहे. कंपनी MTNL नेटवर्कवरसुद्धा फ्री कॉलिंगची सुविधा दिली आहे. या प्लानमध्ये 30 दिवसांची वैधता मिळत आहे. याशिवया यात 10GB चा इंटरनेट डेटा मिळत आहे.

हेदेखील  वाचा- खुशखबर! BSNL ने आणला 599 रुपयात 450GB चा जबरदस्त डेटा प्लान, वाचा सविस्तर

तर दुसरीकडे 1999 रुपयाच्या प्रीपेड प्लानची वैधता 74 दिवसांनी वाढवली आहे.

याचा लाभ त्याच ग्राहकांना घेता येईल जे 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2020 दरम्यान रिचार्ज करतील. या प्लानमध्ये दिवसा 3GB डेटा देण्यात आला आहे जो 365 दिवस मिळेल. तसेच 247 रुपयाच्या प्लानची वैधता 6 दिवसांनी वाढविण्यात आली आहे. यासाठी देखील 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2020 दरम्यान रिचार्ज करावे लागेल. त्याचबरोबर यात Eros Now चे सब्सक्रिप्शन सुद्धा मिळत आहे.

याआधी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) कंपनीने एक जबरदस्त इंटरनेट डेटा प्लान आणला आहे. ज्यात 599 रुपयात तुम्हाला 450GB चा डेटा मिळत असून अनलिमिटेड कॉल्सची (Unlimited Calls) सुविधा देखील देण्यात आली आहे. सध्या कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) अनेक Work From Home करत आहेत. असा वेळी त्यांना इंटरनेटच्या कमी स्पीडमुळे कामात व्यत्यय येऊ नये यासाठी BSNL ने हा प्लान आणला आहे. या प्लानमध्ये तुम्हाला 90 दिवसांची वैधता मिळणार आहे. त्यासोबतच यात तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स आणि दर दिवशी 5GB डेटा मिळत आहे.