
देशातील दिग्गज नेटवर्क प्रोव्हाडर कंपनी Bharti Airtel कडून आपल्या ग्राहकांना फायदा करुन देण्यासाठी एकापेक्षा एक उत्तम प्लॅन रोलाउट करते. नुकत्याच कंपनीने आपल्या कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांना सध्याच्या कोरोनाच्या परिस्थिती आपल्या नेटवर्क सोबत जोडून रहावे यासाठी स्पेशल फायद्यांची घोषणा केली आहे. कंपनीकडून ग्राहकांना 49 रुपयांना रिचार्ज पॅक फ्री देत आहे. यामध्ये ग्राहकांना 100MD डेटा आणि वॉइस कॉलिंगसाठी 38 रुपयांचा टॉकटाइम मिळणार आहे. वैधतेबद्दल बोलायचे झाल्यास ती 28 दिवसांची आहे. आपल्या या योजनेच्या माध्यमातून Airtel आपल्या 5.5 कोटींहून अधिक ग्राहकांना सक्षम बनवू पाहत आहे. यामध्ये बहुतांश ग्रामीण लोकांचा समावेश आहे.
तर कंपनीचा 79 रुपयांचा सुद्धा प्रीपेड प्लॅन उपलब्ध असून त्यामध्ये युजर्सला 200MB डेटा मिळणार आहे. 28 दिवसांची वैधता असलेल्या या पॅकमध्ये ग्राहकांना 38 रुपयांचा टॉकटाइम मिळणार आहे. तसेच Local/STD/LL चे दर 60 पैसे प्रति मिनिट असणार आहे. डेटा लिमिट संपल्यानंतर 50 पैसे प्रति MB चार्ज लागणार आहे. या व्यतिरिक्त कंपनीचा 249 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सला रोज 1.5 जीबी डेटा मिळणार आहे. एकूण ग्राहकांना 42GB डेटा मिळणार आहे. वैधतेबद्दल बोलायचे झाल्यास 28 दिवसांचा असणार आहे. वॉइस कॉलिंगसाठी अनिलिमिडेट वॉइस कॉलिंग मिळणार आहे. अन्य फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 100 मेसेज प्रति दिन पाठवता येणार आहे.
Airtel कंपनीचा 2698 रुपयांच्या वार्षिक प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सला रोज 2GB डेटा मिळणार आहे. या व्यतिरिक्त प्लॅनमध्ये अनिलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि रोज 100 SMS मिळणार आहे. 365 दिवसांची वैधता मिळणार असून यामध्ये Disney+ Hotstar चे एका वर्षासाठी वीआयपी सब्सक्रिप्शन मिळणार आहे. (Amazon Prime चा 'हा' सर्वात स्वस्त सब्सक्रिप्शन प्लॅन बंद, RBI चा नवा नियम ठरले कारण)
एअरटेलच्या 497 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सला 1.5 जीबी डेटा मिळणार आहे. एकूण मिळणार ग्राहकांना 84 जीबी डेटा मिळणार आहे. 56 दिवसांची वॅलिडिटी मिळणार असून वॉइस कॉलिंगसाठी अनिमिलेटेड कॉल करता येणार आहे. अन्य फायद्यांबद्दल बोलायचे झाल्या, यामध्ये 100 मेसेज प्रति दिन पाठवता येणार आहेत. तसेच कंपनी या प्लॅनमध्ये Airtel TV Premium, Airtel Xstream App आणि Wynk Music चे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे.