ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon ने आपला सब्सक्रिप्शन प्लॅनमध्ये मोठा बदल केला आहे. अॅमेझॉनकडून आपला सर्वाधिक स्वस्त महिन्याभराचा सब्सक्रिप्शन प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच युजर्सला आता अॅमेझॉन प्राइमचा 129 रुपयांचा प्लॅन उपलब्ध करुन दिला जाणार नाही आहे. अॅमेझॉन कडून आपल्या सपोर्ट पेजवर याची घोषणा करत असे लिहिले आहे की, कंपनी अॅमेझॉन प्राइमच मंथली सब्सक्रिप्शन प्लॅन बंद करत आहे. या व्यतिरिक्त अॅमेझॉनने आपली मोफत ट्रायल सर्विस सुद्धा बंद केली आहे. जी नव्या मेंबर्ससाठी उपलब्ध करुन दिली जात होते. त्याचसोबत 27 एप्रिल 2019 मध्ये कंपनीने नव्या मेंबर्सला मोफत साइन-अप करण्यासाठीचे प्लॅन अस्थायी स्वरुपात बंद केले आहेत.
मंथली प्लॅन बंद करण्यामागील कारण असे की, आरबीायचा नवा नियम आहे. त्यानुसार आरबीआयने बँकांसाठी ऑटो डेबिटच्या नव्या नियमाचे पालन करण्यासाठी डेडलाइन वाढवून 30 सप्टेंबर 2021 केली आहे. त्यामुळे अॅडिशनल फॅक्टर ऑथेंटिकेशन (AFA) किंवा वेरिफिकेशनसाठी अतिरिक्त उपायांना अनिवार्य केले आहे. त्यानुसार कार्ड किंवा प्रीपेड पेमेंट इंस्ट्रुमेंट (PPI) किंवा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) चा उपयोग करुन ऑटोमॅटिक रेकरिंग पेमेंटची व्यवस्था जर एएफएचे पालन होत नसल्यास तर ही व्यवस्था येत्या 30 सप्टेंबर पर्यंत नसणार आहे.(WhatsApp ला Google देणार टक्कर, उतरवले हे शानदार चॅटिंग अॅप)
युजर्सला आता अॅमेझॉन प्राइमच्या सब्सक्रिप्शनसाठी 329 रुपयांचा तीन महिन्यांचा प्लॅन घ्यावा लागणार आहे. तसेच वर्षभराचा प्लॅन 999 रुपये आहे. भारतात अॅमेझॉनने नवा miniTV व्हिडिओ स्ट्रिमिंग सर्विस ही लॉन्च केली आहे. ही सर्विस भारतासाठी उपलब्ध करुन दिली आहे. येत्या दिवसात iOS आणि मोबाईल वेब मध्ये सुद्धा उपलब्ध केली जाणार आहे.