भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि युवराज सिंघ (Yuvraj Singh) याचे वडील योगराज सिंघ (Yograj Singh) यांनी मागील कित्येक वर्षात धोनीवर कित्येक आरोप केले आहेत. त्यांनी युवराजला संघाबाहेर ठेवण्यासाठी आणि त्याचे करिअर संपवण्यात धोनीचा हात असल्याचे आरोपही योगराज यांनी अनेकदा केला आहे. मुख्य कारण हे धोनीच आहे. योगराज यांनी धोनीवर वारंवार टीका केली आहे. आता भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर योगराज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. विश्वचषकच्या अंतिम सामन्यानंतर योगराज यांनी धोनीवर मुद्दाम सेमीफायनल सामना हरण्याची गंभीर आरोप केला आहे. सेमीफाइनलमध्ये न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध धोनी हा मार्टिन गप्टिल (Martin Guptil) याच्या अप्रतीम थ्रोमुळे धावबाद झाला. (India's tour of West Indies 2019: टीम इंडिया च्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधीची शक्यता, ही नावे आघाडीवर)
एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत योगराज म्हणाले की,''न्यूझीलंडने ठेवलेले माफक लक्ष्य धोनी पूर्ण करू शकला असता, पण त्याची तशी इच्छाच नव्हती. त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणी भारतीय कर्णधाराने विश्वचषक उचलावा, हे त्याला नको होते. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) खोऱ्याने धावा करत होता, त्यावेळी भारत हे लक्ष्य पार करेल असे स्पष्ट चित्र होते. पण, धोनीने त्यावेळी उपयुक्त खेळी केली नाही.''
याशिवाय योगराज यांनी अंबाती रायुडू याच्या अकाली निवृत्तीसाठी देशील धोनीला जबाबदार ठरवले. रायुडूच्या निवृत्तीमागे धोनीला कारणीभूत मनात योगराज यांनी धोनीला घाण म्हणाले आहेत.