(Photo Credit: Getty Image)

आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषक संपुष्टात आले आहे. भारतीय संघाचा (India Team) सेमीफायनलमध्ये पराभवामुळे त्यांचे विश्वचषक जिंक्यनाचे स्वप्न धुळीस मिळाले. मात्र, आता मागील गोष्टी विरून टीम इंडिया वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यासाठी सज्ज होत आहे. भारतीय संघ 3 ऑगस्ट पासून 3 सप्टेंबर पर्यंत इंडिज दौऱ्यावर असणार आहे. भारतीय संघ इंडीजविरुद्ध तीन टी-20 आणि तीन वनडे सामने खेळतील. तर अँटीगुआ (Antigua) आणि जमैका (Jamaica) मध्ये दोन टेस्ट सामने देखील खेळवण्यात येतील. टेस्ट मालिका 22 ऑगस्टपासून सुरू होणार आहे, जे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे. (वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी 19 जुलैला होणार टीम इंडियाची निवड; शिखर धवन, एम एस धोनीच्या सिलेक्शनबाबत शंका)

दरम्यान, या दौऱ्यासाठी संघाची निवड 19 जुलैला होईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार कर्णधार विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भूवनेश्वर कुमार आणि एम एस धोनी यांना विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे. पण, कोहली आणि बुमराह टेस्ट मालिकांसाठी परतण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, वनडे आणि टी-20 घरगुती आणि अन्य सामन्यात चांगले प्रदर्शन करण्यासाठी काही नवीन युवा चेहऱ्यांची निवड होण्याची शक्यता आहे.

वेस्ट इंडीज दौऱ्याची सुरुवात टी-20 मालिकापासून होणार आहे. यासाठी संघात शुभमन गिल (Shubhman Gill) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांना जागा मिळू शकते. तर रिषभ पंत (Rishabh Pant) यष्टीरक्षक म्हणून संघात असेल. गोलंदाज नवदीप सैनी (Navdeep Saini), दीपक चहर (Deepak Chahar), खलील अहमद (Khaleel Ahmed) यांना जागा मिळण्याची शक्यता आहे. तर वनडे मालिकांसाठी श्रेयस आणि सैनी यांची नावे आघाडीवर आहे. दुसरीकडे, टेस्ट मालिकेसाठी मयंक अग्रवाल (Mayank Agarwal), हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि सैनी यांना स्थान मिळू शकते.