भारतीय संघ (Photo Credit/Getty Image)

आयसीसी (ICC) 2019 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा समपुष्टात आली आहे आणि वेळी आहे ती द्विपक्षीय मालिकेची. एकीकडे वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंड (England) ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध आपल्या भूमीवर ऍशेस (Ashes) मालिका खेळेल दुसरीकडे, भारतीय संघ (Indian Team) एक महिन्याच्या कॅरिबियन दौऱ्यासाठी सज्ज आहे. टीम इंडियाचा वेस्ट इंडिज (West Indies) दौरा 3 ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. याबाबत टीम इंडियाची घोषणा 19 जुलैरोजी करण्यात येणार आहे. दीड महिने चहलेल्या विश्वचषकच्या स्पर्धेतील काही भारतीय खेळाडूंना वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांना विश्रांती देण्याची शक्यता आहे.

दरम्यान, माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) यांच्या संघात निवडबाबत काही स्पष्टता नाही आहे. 9 जुलैला विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध पराभवानंतर धोनीच्या भविष्याबद्दल मोठ्या प्रमाणावर अंदाज वर्तवला जात आहे. एम एस के प्रसाद (MSK Prasad) यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती वेस्ट इंडीजशी होणाऱ्या सीरिजमध्ये टीम इंडियामध्ये काही नवीन चेहऱ्यांना संधी देऊ शकते. दुसरीकडे, शिखर धवनच्या अंगठ्याच्या दुखापतीबद्दल देखील काही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. धवनला विश्वचषकाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात बोटाला दुखापत झाली होती.

भारतीय संघ 3 ते 14 ऑगस्ट दरम्यान वेस्ट इंडीजविरुद्ध तीन टी-20 आणि तीन वनडे सामने खेळतील. तर अँटीगुआ (Antigua) आणि जमैका (Jamaica) मध्ये दोन कसोटी सामने खेळणार आहे.