Year Ender 2020: टोकियो ऑलिम्पिक ते टी-20 वर्ल्ड कप; COVID-19 महामारीचा यंदा 'या' प्रमुख क्रीडा स्पर्धांना बसला फटका
कोरोना व्हायरसमुळे टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन धोक्यात (Photo Credit: Twitter/Pixabay)

Year Ender 2020: COVID-19 चा परिणाम 2020 मध्ये क्रीडा विश्वावर मोठ्या प्रमाणावर बसला. कोरोना व्हायरस (Coronavirus) हे यंदाच्या एक रोड-ब्लॉक ठरले, ज्याचे वेगवेगळ्या खेळांमधील काही सर्वात मोठे क्रीडा स्पर्धा (Mega Sporting Events) साक्षीदार बनले. काही स्पर्धा पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलण्यात आल्या, तर काही 2020 मध्ये जैव-सुरक्षित बबलअंतर्गत खेळवण्यात आले. मार्च महिन्यात कोरोना व्हायरसच्या उद्रेकानंतर जून महिन्यात इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. कोरोना काळात वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघाने इंग्लंडचा दौरा केला. तर UEFA चॅम्पिअन्स लीगही याच दरम्यान खेळली गेली. लक्षात घेण्यासारखे म्हणजे यंदा काही मोठा क्रीडा स्पर्धा आयोजित होणे अपेक्षित होते, मात्र कोरोना व्हायरसच्या जगभरात होणाऱ्या प्रसारामुळे ते रद्द किंवा पुढे ढकलण्यात आले. (Year Ender 2020: वादविवाद! ‘या’ 5 घटनांमुळे यंदाचे वर्ष कोणीच विसरू शकणार नाही)

जगभरातील मोठ्या क्रीडा स्पर्धा ज्या 2020 मध्ये पुढे रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या त्याच्या यादी पाहा...

1. टोकियो ऑलिम्पिक 2020

ऑलिम्पिक खेळांचे आयोजन यंदा 24 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान होणार होते, परंतु कोविड-19 च्या उद्रेकामुळे ते 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आले. टोकियो ऑलिम्पिक आता पुढच्या वर्षी 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान आयोजित केले जाईल. 23 जुलै रोजी होणाऱ्या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी ऑलिम्पिक स्टेडियममध्ये मशाल 9 जुलै रोजी पोहोचेल.

2. युरो 2020

2020 मध्ये 12 जूनपासून युरोपमधील 12 राष्ट्रांमध्ये फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात येणार होती. प्रस्तावित नवीन तारखा 11 जून ते 11 जुलै 2021 अशा आहेत. क्रिस्टियानो रोनाल्डोचा पोर्तुगालने 2016 च्या लढतीत फ्रान्सचा पराभव करीत युरो चॅम्पियन बनला होता. इटली, स्पेन आणि फ्रान्ससारख्या युरोपियन देशांमध्ये कोविड प्रकरणे वाढल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

3. विम्बल्डन 2020

ऑलिम्पिक खेळ आणि युरो 2020 यासारख्या स्पर्धा 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्यानंतर ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लबने 1 एप्रिल रोजी विम्बल्डन रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेतला. हा निर्णय टेनिस जगाला धक्कादायक ठरला कारण प्रत्येक जण टूर्नामेंट काही महिने पुढे ढकलले जाण्याची अपेक्षा करत होता. विम्बल्डन आता 2021 मध्ये 28 जून ते 11 जुलै या कालावधीत रंगणार आहे.

4. टी -20 वर्ल्ड कप 2020

महामारीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला 2020 टी-20 वर्ल्ड कप पुढे ढकलण्यास भाग पाडले, ज्याचे आयोजन यंदा ऑस्ट्रेलियामध्ये 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान होण्याचे नियोजन होते. आयसीसीने नंतर जाहीर केले की ही स्पर्धा 2022 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित केली जाईल, तर स्पर्धेचा अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल.

कोरोना व्हायरसचा फाटका आयपीएल आणि पीएसल सारख्या प्रसिद्ध टी-20 लीगना देखील बसला. मार्च महिन्यात होणारे आयपीएलचे आयोजन पुढे ढकलण्यात आले असून सप्टेंबर-नोव्हेंबर दरम्यान युएई येथे खेळाचे आयोजन झाले. पाकिस्तान सुपर लीगचे प्ले-ऑफ सामने देखील स्थगित कारतण्यात आले. मात्र, आयपीएल फायनलनंतर पाकिस्तानमधेच त्यांचे आयोजन केले गेले.