Vizag Gas Leak: विशाखापट्टणम गॅस गळती दुर्घटनेमुळे विराट कोहली, युवराज सिंह समवेत खेळाडू दुःखी, रुग्णालयात असलेल्या लोकांसाठी केली प्रार्थना
Gas Leakage at LG Polymers Plant (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसच्या संकट काळात आंध्र प्रदेश मधील विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत गुरुवारी एक मोठा अपघात झाला ज्यात आजवर 10 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी विशाखापट्टणममधील केमिकल प्लांटमध्ये गॅस गळतीमुळे (Gas Leak) लोकं अडचणीत सापडले. 800 हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गॅस गळतीमुळे तीन किलोमीटरच्या परिघात असलेल्या 5 गावात 1000 हून अधिक लोक आजारी पडले आहेत असे सांगितले जात आहे. तथापि, बचाव दल मदतकार्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. पण परिस्थिती बर्‍यापैकी भयानक आहे. या अपघातानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), हार्दिक पंड्या, युवराज सिंह (Yuvraj Singh) यांच्या समवेत दिग्गज खेळाडूंनी या अपघातात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दुसरीकडे, सोशल मीडियावर या घटनेविषयी वारंवार पोस्ट्स येत आहेत. ही घटना 1984 च्या भोपाळ गॅस दुर्घटनेची आठवण करून देणारी आहे असे ते म्हणत आहेत. (आंध्र प्रदेश: विशाखापट्टणम मध्ये LG Polymers Industry मधून विषारी वायू गळतीमुळे 3 जणांचा मृत्यू; 5 गावं सुरक्षेच्या कारणास्तव रिकामी)

कोहलीनेही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आणि या घटनेत आपले प्रियजन गमावलेल्या कुटूंबियांबद्दल शोक व्यक्त केले. भारताचा माजी अष्टपैलू युवराजनेही मृतांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केली आणि सध्या जे रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेल्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. रविचंद्रन अश्विन यांनीही गॅस दुर्घटनेबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आणि दृश्यांना ‘त्रासदायक’ म्हटले. जेव्हा संपूर्ण जग कोरोना व्हायरस विरोधात झगडत आहे, अशा दुःखद बातमीने बर्‍याच लोकांना धक्का बसला.

क्रीडा क्षेत्राने कशी प्रतिक्रिया दिली ते पाहा:

विराट कोहली

युवराज सिंह

हार्दिक पंड्या

शिखर धवन

रिषभ पंत

रवींद्र जडेजा

पीव्ही सिंधू

सुनील छेत्री

हरमनप्रीत कौर

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून म्हटले होते की ते परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास गॅस गळतीची घटना घडली. अद्याप बचावकार्य सुरू आहे. लॉकडाउनमुळे प्लांट बंद होता. या विषारी वायूमुळे कारखान्याचे तीन किलोमीटर पर्यंतचा भाग बाधित आहे. डोकेदुखी, उलट्या आणि श्वसनाच्या त्रासामुळे बरेच लोक रुग्णालयात दाखल झाले आहेत. कारखान्याच्या आसपासच्या भागातून 3 हजार लोकांना वाचविण्यात आले आहे.