Video: लॉरेस स्पोर्टिंग मोमेंट अवॉर्ड जिंकल्यानंतर सचिन तेंडुलकर याची स्पीच तुमच्यासाठी नक्की ठरेल प्रेरणादायी
सचिन तेंडुलकर (Photo Credit: Getty Images)

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांना लॉरेस स्पोर्टिंग मोमेंट (Laureus Sporting Moment) 2000-2020 च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतात खेळवण्यात आलेल्या 2011 विश्वचषक (World Cup) जिंकल्यानंतर सचिनला त्याच्या सहकाऱ्यांनी खांद्यावर उचलून घेऊन मैदानावर 'लैप आफ ऑनर' (Lap Of Honour) मारला होता. तो क्षणाला गेल्या 20 'लॉरेस बेस्ट स्पोर्ट्स मोमेंट' चा पुरस्कार देण्यात आला. भारतीय संघाने महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेचा पराभव करून विश्वचषक जिंकला. 2011 मध्ये सचिनने सहाव्या प्रयत्नात क्रिकेट विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न साकार केले आणि त्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला खांद्यावर उचलले. भारतीय क्रिकेटमधील हा एक महत्त्वाचा क्षण होता. टेनिस दिग्गज ब्रॉस बेकरने जर्मनीमध्ये आयोजित समारंभात विजेता घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि स्वत: विश्वचषक जिंकणारा स्टीव्ह वॉ सह तेंडुलकरला ट्रॉफी दिली. (सचिन तेंडुलकर ला Laureus ने दिला मोठा सन्मान, 'वर्ल्ड कप विनिंग मोमेंट' 20 वर्षाच्या खेळामधील ठरला सर्वोत्कृष्ट क्षण)

बेल्जियममध्ये लॉरियस स्पोर्टिंग मोमेंट अवॉर्ड जिंकल्यानंतर, ती रात्र आठवताना सचिनने हा पुरस्कार मिळाल्यानंतर प्रेरणादायी स्पीच दिली. मास्टर-ब्लास्टरने क्रिकेटपटू म्हणून त्याच्या प्रवासाबद्दल आणि दोन विश्वचषकातील विजयाचे मूल्य, जे कोणत्याही भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देतील. "अदभूत. विश्वचषक जिंकण्याची भावना शब्द व्यक्त करू शकत नाही. मिश्रित भावना नसलेल्या असे किती वेळा कार्यक्रम होत असतात. फारच क्वचितच संपूर्ण देश साजरा करतो, ”ट्रॉफी मिळाल्यानंतर सचिन म्हणाला. “हा खेळ किती शक्तिशाली आहे आणि लोकांच्या जीवनावर त्याचा कसा परिणाम होतो हे दर्शविते."

खेळाची अविश्वसनीय शक्ती

त्यानंतर बेकरने तेंडुलकरला त्यावेळेच्या भावना सांगायला सांगितले आणि सचिनने त्याच्यासाठी ट्रॉफी पकडणे किती महतवाचे होते हे सांगितले. “माझी यात्रा 1983 मध्ये मी 10 वर्षांचा असताना सुरू केली. भारताने विश्वचषकजिंकला होता. मला त्याचे महत्त्व कळले नाही आणि प्रत्येकजण उत्सव साजरा करत असल्यामुळे मीही सामील झालो." “परंतु मला कुठेतरी माहित होतं की देशामध्ये काहीतरी विशेष घडलं आहे आणि मला एक दिवस त्याचा अनुभव घ्यायचा आहे आणि असा माझा प्रवास सुरु झाला.” दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी त्याच्यावर आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वावर कसा मोठा प्रभाव पाडला याबद्दलही सचिन बोलला.