सचिन तेंडुलकर ला Laureus ने दिला मोठा सन्मान, 'वर्ल्ड कप विनिंग मोमेंट' 20 वर्षांमधील ठरला सर्वोच्च क्षण
सचिन तेंडुलकर लॉरेयस20 स्पोर्टिंग मूमेंट 2000-2020 (Photo Credit: Getty)

क्रिकेटचा देव म्हटल्या जाणारा टीम इंडियाचा (India) माजी फलंदाज आणि मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला लॉरेयस20 स्पोर्टिंग मूमेंट (Laureus Sporting Moment) 2000-2020 च्या पुरस्काराने सन्मानित केले आहे. सचिनच्या 2011 विश्वचषक (World Cup) जिंकणाऱ्या क्षणाला गेल्या 20 वर्षात खेळातील सर्वोत्कृष्ट मोमेंट ऑफ स्पोर्ट्सचा लॉरेन्स पुरस्कार मिळाला. क्रिकेट खेळपट्टीपासून दूर असूनही खेळाचा देव मानला जाणारा सचिनची लोकप्रियता कमी झालेला नाही. जर्मनीची राजधानी बर्लिन येथे आयोजित कार्यक्रमात सचिनच्या नावाची घोषणा करण्यात आली. 2011 च्या विश्वचषक विजयाच्या संदर्भात तेंडुलकरशी संबंधित या क्षणाचे नाव 'कॅरीड ऑन द शोल्डर्स ऑफ अ नेशन्स' (Carried On The Shoulders Of A Nation) असे देण्यात आले आहे. 2000 ते 2020 या कालावधीत सर्वोत्कृष्ट लॅरेस गेम मोमेंटच्या शर्यतीत दिग्गज फलंदाज सचिनसह 20 स्पर्धक होते. तब्बल नऊ वर्षांपूर्वी सचिन सहाव्या विश्वचषकात खेळत विश्वविजेतेपद जिंकणार्‍या भारतीय संघाचा सदस्य होता. दिग्गज टेनिसपटू बोरिस बेकर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू स्टीव्ह वॉ यांच्या हस्ते सचिनला हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारासाठी पाच क्षण नामांकित झाले होते.

सचिन हा पुरस्कार जिंकल्यानंतर रंगमंचावर आला. हा पुरस्कार जिंकल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि म्हणाला की, "हा खेळ किती शक्तिशाली आहे आणि लोकांच्या जीवनावर त्याचा कसा परिणाम होतो हे दर्शविते."

2011 चा विश्वचषक फायनल भारत-श्रीलंकामध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळण्यात आला होता. फायनलमध्ये श्रीलंकेवर थरारक विजय मिळवल्यावर भारतीय संघातील सदस्यांनी तेंडुलकरला खांद्यावर घेऊन मैदानावर 'लैप आफ ऑनर' मारला होता आणि यावेळी दिग्गज फलंदाजाचे अश्रू अनावर झाले. वॉ लॉरेस अ‍ॅकॅडमीचा सदस्य आहे, त्याने सचिनच्या नामांकनाला क्रिकेटमध्ये एक उत्तम क्षण म्हणून संबोधले आहे. भारताच्या विजयानंतर टीम इंडियाने सचिनला खांद्यावर उचलून स्टेडियमच्या फेऱ्या मारल्या. हा फोटो सर्वांनाच आवडला आणि आता त्याला स्पोर्टिंग मोमेंट्स 2000-2020 म्हणून निवडले गेले आहे.