सचिन तेंडुलकर याची डिजिटल एंटरटेनमेंट कंपनी JetSynthesys मध्ये 14.8 कोटी रुपयांची गुंतवणूक
सचिन तेंडुलकर (Photo Credit: Getty)

डिजिटल एंटरटेनमेंट अॅन्ड टेक्नॉलॉजी कंपनी जेटसिंथेसिस (JetSynthesys) ने गुरुवारी एका विधानात असे म्हटले आहे की, भारतातील प्रसिद्ध माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने कंपनीत 20 लाख डॉलर (जवळजवळ 14.8 कोटी रुपये) ची गुंतवणूक केली आहे. जेटसिंथेसिस पुणे येथील कंपनी असून भारताव्यतिरिक्त त्यांची जापान, ब्रिटेन, युरोपीय संघ, अमेरिकेत ऑफिस आहे. गुंतवणूक केल्यानंतर सचिन तेंडुलकर याचे कंपनीसोबत संबंध अधिक मजबूत झाले आहेत. या दोघांच्या मध्ये आधीच डिजिटल क्रिकेट डेस्टिनेशन 100MB आणि इमर्सिव क्रिकेट गेम- 'सचिन सागा क्रिकेट' आणि 'सचिन सागा वीआर' चे एक जॉइंट वेंचर आहे.

तेंडुलकर यांने असे म्हटले की, जेटसिंथेसिस सोबतचे माझे संबंध जवळजवळ पाच वर्ष जुने आहेत. आम्ही सचिन सागा क्रिकेट चॅम्पियन्स पासून सुरुवात केली. तसेच तो एका खास वर्च्युअल रिअॅलिटि क्रिकेट अनुभवासह मजूबत केला आहे. हा सर्वाधिक लोकप्रिय गेल असून तो तब्बल दोन कोटीहून अधिक वेळा डाऊनलोड केला गेला आहे.(MS Dhoni New Look: माजी कर्णधार धोनीने केले Makeover, पाहा त्याचा नवा लूक)

या करारानंतर जेटसिंथेसिसचे वाइस चेअरमॅन आणि एमडी राजन नवानी यांनी म्हटले की, 100MB सह कंपनीने सचिनच्या चाहत्यांसाठी असे एक प्लॅटफॉर्म तयार करण्याची संधी दिली आहे. जेथे ते लोक त्याच्यासोबत थेट जोडले जाऊ शकतात. नवानी यांनी पुढे असे म्हटले, या गुंवतणीकीसह आम्ही सचिनला जेटसिंथेसिस परिवार आणि अधिक महत्वाचा सदस्य म्हणून पाहण्यासाठी अधिक उत्सुक आहोत. आम्हाला भारत रत्न, प्रतिष्ठित व्यक्ती, भारतीय आणि जागतिक ब्रँन्डवर गर्व आहे. कारण आम्ही एक जागतिक स्तरावरील डिजिटल मीडिया मनोरंजन आणि खेळाच्या प्लॅटफॉर्मची निर्मिती करणार आहे.