'मास्टर ब्लास्टर, कॅप्टन कूल, द वॉल, हेरिकेन, कशामुळे भारतीय क्रिकट संघातील 11 खेळाडूंना देण्यात आली अशी नावे, पाहा यामागील रंजक कहाणी
सचिन तेंडुलकर (Photo Credit: Getty)

भारतीय संघात एखाद्या खेळाडूला दोन नाव असणे हे काय नवीन नाही. परंतु, काही खेळाडूंनी मैदानात असताना मिळवलेली नावे अनेकांना माहिती नाहीत. तसेच मैदानात कपिल, सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंह धोनीला यांच्यासह अनेक खेळाडूंना दुसऱ्या नावाने ओळखले जाते, याची कल्पना आहे. परंतु, हे नाव कशामुळे या खेळाडूंना देण्यात आली याची अनेकांना माहीती नाही. तसेच जगभरात भारताचा तिरंगा फडकणारे काही खेळाडूंना अन्य देशात एक वेगळ्या नावाने संबोधले जाते. कपिलदेव पासून ते महेंद्र सिंह धोनी यांच्यासह भारतीय संघातील खेळाडूंनी उत्तम प्रदर्शनाच्या जोरावर मैदानात मिळवलेली नव्या नावांची यादी पुढीलप्रमाणे

कपिल देव

भारताला प्रथमता विश्वविजेता बनवणाऱ्या कपिल देव यांना चाहत्यांकडून हरियाणा हरिकेन या नावाने संबोधले गेले. कपिल देव हे हरियाणाचे रहवासी होते आणि त्यांच्या जबदरस्त गोलंदाजीने त्यांनी हरियाणातील लोकांना प्रभावित केले होते. त्यांच्या गोलंदाजीने त्यांना हे नाव मिळवून दिले होते. कपिल देव यांनी १३१ टेस्ट सामन्यात 434 तर, 225 एकदिवसीय सामन्यात 252 विकेट घेतले होते.

मोहम्मद अझरुद्दीन

भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन हे एक उत्तम फलंदाज होते. मोहम्मद अझरुद्दीन फलंदाजी करत असताना, त्यावेळी कितीही वेगाने चेंडू आला तरी त्याचे चौकात रुपांतर करण्याची क्षमता त्यांच्यात होती. यामुळे त्यांच्या चाहत्यांनी त्यांना कलाई के जादुगर असे नावाजले. मोहम्मद अझरुद्दीन यांनी 1984 साली क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

सचिन तेंदुलकर

सचिन तेंडुलकर यांना मास्टर ब्लास्टर म्हणून का संबोधले जाते, हे सांगणे गरजेचे नाही. संपूर्ण जगाला माहिती आहे की, सचिन तेंडुलकर हे कोणत्या अंदाजात क्रिकेट खेळले आहेत. सचिन तेंडुलकर यांनी पाकिस्तान विरोधात शारजाह मैदानात धावांचे डोंगर उभारले होते. त्यानंतर सचिन यांना मास्टर ब्लास्टर या नावांनी ओळखले जाऊ लागले.

अनिल कुंबले

भारताचे यशस्वी गोलंदाज अनिल कुंबले यांनी उत्तम गोलंदाजीच्या जोरावर कसोटी सामन्यात 500 विकेट घेतले आहेत. अनिल कुंबले यांनी फिरकी गोलंदाज म्हणून भारतीय संघात स्थान मिळवले होते. परंतु, फिरकी गोलंदाजी करतानाही त्यात वेग दिसत असे. यामुळे चाहत्यांनी त्यांना जंबो या नावाने संबोधले होते.

सौरव गांगुली

भारताचे यशस्वी माजी कर्णधार, फलंदाज सौरव गांगुली यांच्या खेळीने अनेकजण प्रेरीत झाले आहेत. सौरभ गांगुली हे डावखुरे फलंदाज असून चांगल्या गोलंदाजाच्या मनात भिती निर्माण करण्याची त्यांच्याकडे क्षमता होती. सौरव गांगुली हे कोणत्याही चेंडूला ऑफ साईड बॉन्ड्रीच्या बाहेर पोहवायचे. त्यांच्या अनोखी कला पाहून त्यांना गॉड ऑफ, ऑफ साईड अशी उपमा दिली होती.

व्हीव्हीएस लक्ष्मण

व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2001 मध्ये ईडन गार्डन्स मैदानावर शानदार फलंदाजीच्या जोरावर ईडन गार्डन्स मैदानावर विजय मिळवून दिला. या विजयानंतर, देशाने त्यांना व्हेरी व्हेरी स्पेशल या नावाने सन्मानित केले आहे. त्या सामन्यात लक्ष्मण यांनी 281 धावांची खेळी केली होती. 1996 साली त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पण केले.

राहुल द्रविड

राहुल द्रविड हे अतिशय संयमी खेळी करणारे फलंदाज म्हणून ओळखले जात असे. कोणत्याही संघाच्या विरोध धावफळीवर टिकून राहण्याची त्यांच्याकडे क्षमता होती. यामुळे त्यांना द वॉल या नावाने ओळखले जाऊ लागले.

वीरेंद्र सेहवाग

भारतीय संघाचा सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांनी प्रत्येक देशाविरूद्ध आक्रमक फलंदाजी केली आहे. सेहवागने 2004 मध्ये मुलतान मैदानावर पाकिस्तानविरुद्ध 309 धावा फटकावल्या होत्या सेहवागची ही स्फोटक शैली पाहून क्रिकेटप्रेमींनी त्याला मुलतानच्या सुलतानचे नाव दिले.

हरभजन सिंह

हरभजन सिंगने 1998 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघासाठी पहिला सामना खेळला होता. हरभजन मैदानावर पगडी घालून बॉलला अप्रतिम वळत देत असे. हरभजनची पगडी आणि त्यांचे वळण एकत्र करून देशाने त्याला टर्बनेटरचे नाव दिले.

युवराज सिंह

एकेकाळी भारतीय संघासाठी मध्यम ऑर्डरसाठी खेळी करणारा युवराज सिंग हा जगात सिक्सर किंग म्हणून ओळखला जातात. 2007 च्या इंग्लंडविरुद्धच्या टी -20 विश्वचषकात युवराज सिंहने इंग्लंड विरुद्ध एका षटकात 6 षटकार मारले होते. यामुळे त्याला सिक्सर किंग म्हणून संबोधले गेले आहे

एम एस धोनी

मैदानावर कठीण परिस्थितीतही शांत राहण्यासाठी एमएस धोनीला ओळखले जाते. यामुळ महेंद्र सिंह धोनीला कॅप्टन कूल म्हणून ओळखले जाते. महेंद्र सिंह धोनीने 2004 मध्ये बांग्लादेश विरुद्ध पहिला सामना खेळला होता.