Maharashtra Kesari Kusti Final 2019-20: हर्षवर्धन सदगीर विरुद्ध शैलेश शेळके यांच्यात 7 जानेवारीला रंगणार अंतिम सामना, बाला रफिक शेख स्पर्धेतून बाहेर
Kusti Image For Representation (Photo Credits: Instagram)

Maharashtra Kesari Kusti Final 2020: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आजचा चौथा दिवस होता. आज पुणे बालेवाडीमध्ये शिवछत्रपती क्रीडानगरीत 63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची सेमीफायनल रंगली होती. आजच्या कुस्तीमधील लढत बाला रफिक शेख आणि अभिजित कटके यांच्यामध्ये रंगला होता. मात्र आजच्या सामन्यात माती गटातून उतरलेला बाला रफिक शेख याचा अभिजित कटके याने पराभव केला आहे. त्यामुळे बाला रफिक शेख अंतिम सामन्यात खेळू शकेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती पण त्याचे आव्हान संपुष्टात आले आहे. तर उद्या (7 जानेवारी) पार पडणाऱ्या अंतिम सामन्यात अकोला तालुक्याचे  हर्षवर्धन सदगीर विरुद्ध शैलेश शेळके यांच्यात लढत रंगणार आहे. स्पर्धेचे आयोजन हे पुणे येथील शिवछत्रपती क्रीडानगरी मध्ये भरवण्यात आले. या स्पर्धेचे सर्व सामने विना तिकिट मोफत पाहण्याची संधी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध करुन दिली आहे.

कुस्ती स्पर्धेत खुल्या गटामधील मॅट विभागात चौथ्या फेरीत मॅट विभागात अभिजित कटके, सागर बिराजदार, हर्षवर्धन सदगीर, सचिन येलभर तर माती विभागातून बाला रफिक शेख, माऊली जमदाडेस गणेश जगताप आणि शेळके यांनी प्रतिस्पर्धांवर मात करत पाचव्या फेरीत प्रवेश केला होता. हर्षवर्धन सदगीर विरुद्ध शैलेश शेळके अंतिम फेरीत केसरी कुस्तीच्या मानपदासाठी लढणार आहेत.(Maharashtra Kesari Kusti 2018: बाला रफिक शेख, महाराष्ट्र केसरी कुस्ती 2018 विजेते, पहा 1961-2018 पर्यंत कोण कोण आहेत विजेते)

गेल्या वर्षात बाला रफिक शेख याने अभिजित कटकेकर याच्यावर 11-3 ने मात करत महाराष्ट्र केसरीचा मान जिंकत चांदीची गदा मिळवली आहे. बाला रफिक शेख हे मूळचे बुलढाण्याचे आहेत. पहिल्यांदाच बाला शेख महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहचले होते. संधीचं सोनं करत त्यांनी विजेतेपदावर नाव कोरलं होते.