Maharashtra Kesari Kusti 2019-20: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा Tickets मोफत! सामने पाहण्यासाठी जाणून घ्या शिवछत्रपती क्रीडानगरी बालेवाडी पुणे येथे कसे पोहचाल
Maharashtra Kesari | Photo Credits: Facebook

Maharashtra Kesari Kusti 2019-20 Tickets: महाराष्ट्रातल्या मातीतला खेळ म्हणजे कुस्ती. यंदा 'महाराष्ट्र केसरी कुस्ती' (Maharashtra Kesari Kusti) स्पर्धा 3 ते 7 जानेवारीदरम्यान पुण्यामध्ये होणार आहे. तुम्हांलाही या खेळाचं आकर्षण असेल तर थेट स्टेडियमवर जाऊन तुम्ही कुस्तीच्या खेळाचा आनंद घेऊ शकता. दरम्यान यंदा कुस्तीचे सामने शिवछत्रपती क्रीडानगरी म्हाळुंगे-बालेवाडी (Shree Shiv Chhatrapati Sports Complex) पुणे येथे आयोजित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र केसरी कुस्ती 2019-20 स्पर्धेचे सारे सामने मोफत असल्याने तुम्ही हे सामने पाहण्यासाठी थेट शिवछत्रपती क्रीडानगरी म्हाळुंगे-बालेवाडी पुणे स्टेडियमवर पोहचू शकता. पहा यंदा केसरी कुस्ती सामने कधी आणि कुठे पहाल? Maharashtra Kesari 2019-20 Day 1 Live Streaming: 'महारासष्ट्र केसरी कुस्ती' स्पर्धेला आजपासून सुरूवात; इथे पहा लाईव्ह स्ट्रिमिं

 शिवछत्रपती क्रीडानगरी म्हाळुंगे-बालेवाडी पुणे मध्ये आयोजित पुढील 5 दिवसांमधील सामने पाहण्यासाठी सकाळच्या आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रमुख लढती रंगणार आहेत. सकाळी 9-12 आणि संध्याकाळी 4-6 या वेळेमध्ये हे सामने रंगणार आहेत. शिवछत्रपती क्रीडानगरीमध्ये एकाचवेळी 10 हजार प्रेक्षक सामना पाहू शकतील. तर 7 जानेवारीला 6-7 हजार अधिक प्रेक्षक गॅलरीमध्ये बसू शकतील अशी सोय करण्यात आली आहे.

शिवछत्रपती क्रीडानगरी पुणे येथे कसे पोहचाल?

शिवछत्रपती क्रीडानगरी बालेवाडी पुणे हे पुणे स्टेशनपासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर आहे. महामंडळाच्या बस किंवा रिक्षाने तुम्ही स्टेडियमवर पोहचू शकतात.  तुम्हांला स्टेडियमवर पोहचणं शक्य नसेल तर तुम्हांला हे सामने ऑनलाईन पाहण्याची सोय आहे. युट्युबवर तुम्हांला ऑनलाईन लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येणार आहे.

गेली 36 वर्ष मोहोळ कुटुंबीयांकडून 'महाराष्ट्र केसरी' विजेत्यासाठी चांदीची गदा बनवून देण्यात येते.महाराष्ट्र केसरीच्या विजेत्याला चांदीची गदा आणि 2 लाख रुपयाचं रोख बक्षीस दिले जात असल्याने ही स्पर्धा अत्यंत चर्चेची ठरते. मागील वर्षी बाला रफिक यांनी विजेतेपद जिंकले होते.