Maharashtra Kesari 2019 -20 | Photo Credits: Maharashtra State Wrestling Association

Maharashtra Kesari Kusti 2019-20:   मल्लवीरांसाठी मानाच्या असणार्‍या 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धेला आजपासून सुरूवात झाली आहे. दरम्यान यंदा 63 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्यातील बालेवाडीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. आजपासून 7 जानेवारी पर्यंत चालणार्‍या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेची खेळाडूंसोबतच त्यांच्या चाहत्यांमध्येही उत्सुकता असते. त्यामुळे तुम्हीही कुस्ती खेळाचे चाहते असाल आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती 2019 - 20 स्पर्धेचं (Maharashtra Kesari Kusti) तुम्हांला आकर्षण असेल तर तुम्हांला घरबसल्या या स्पर्धेतील विविध आखड्यांचे लाईव्ह स्ट्रिमिंग युट्युबवर पाहता येणार आहे.

आज (3 जानेवारी) सकाळी 9 ते 12 या वेळेत पहिलं सत्र, संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत विविध वजनी गटातील स्पर्धा पार पडणार आहेत. Maharashtra Kesari Kusti 2019-20: 'महाराष्ट्र केसरी कुस्ती' स्पर्धेत आजपासून रंगणार लढती; पहा माती व गादी गटामध्ये आज कोण भिडणार?

इथे पहा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2019-20 पहिल्या दिवसाच्या खेळाचं लाईव्ह स्ट्रिमिंग़

मामासाहेब मोहोळ यांच्याकडून 1961 पासून या कुस्ती स्पर्धेची सुरुवात करण्यात आली होती . मात्र कुस्तीगीर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मामासाहेब मोहोळ यांचे 1982 साली निधन झाल्यानंतर ही परंपरा मोहोळ कुटुंबीयांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला सुपूर्द केली. गेली 36 वर्ष मोहोळ कुटुंबीयांकडून 'महाराष्ट्र केसरी' विजेत्यासाठी चांदीची गदा बनवून देण्यात येते.महाराष्ट्र केसरीच्या विजेत्याला चांदीची गदा आणि 2 लाख रुपयाचं रोख बक्षीस दिले जात असल्याने ही स्पर्धा अत्यंत चर्चेची ठरते.