Maharashtra Kesari Kusti 2019-20: 'महाराष्ट्र केसरी कुस्ती' स्पर्धेत आजपासून रंगणार लढती; पहा माती व गादी गटामध्ये आज कोण भिडणार?
Maharashtra Kesari Kusti 2019-2020 | Photo Credits: Maharashtra State Wrestling Association Facebook Page

 Maharashtra Kesari Kusti 2019-20 Day 1 Time Table: महाराष्ट्राच्या अस्सल मातीतला खेळ म्हणजे कुस्ती! महाराष्ट्रभरातील कुस्तीवीरांना स्पर्धेच्या माध्यमातून आपलं कसब दाखवून हा खेळ जपण्यासाठी महाराष्ट्र केसरी कुस्तीचं आयोजन केलं जातं. यंदा 2 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान ही स्पर्धा पुणे शहरातील बालेवाडीमध्ये आयोजित केला आहे. आजपासून या स्पर्धेचा थरार सुरू झाला आहे. माती आणि गादी अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा रंगते. मग पहा आज माती विभाग आणि गादी विभाग या दोन गटांमधील 57 वजनी गटामध्ये पहा कोण भिडणार एकमेकांसमोर ?

महाराष्ट्र केसरी कुस्ती माती मध्ये दोन आखाडे व मॅटवरील कुस्ती साठी दोन आखाडे अशा एकूण चार आखाड्यात एकदम चार रंगतदार कुस्तीचा थरार कुस्ती शौकीन व कुस्ती प्रेमींना अनुभवता येणार आहे. 63rd Maharashtra Kesari Kusti: महाराष्ट्र केसरी कुस्ती साठी नागपूर, अमरावती संघ जाहीर

57 वजनी गटामधील कुस्तीवीर लढाई

79 किलो वजनी गटातील कुस्तीवीर लढाई

मामासाहेब मोहोळ यांच्याकडून 1961 पासून या कुस्ती स्पर्धेची सुरुवात करण्यात आली होती . मात्र कुस्तीगीर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मामासाहेब मोहोळ यांचे 1982 साली निधन झाल्यानंतर ही परंपरा मोहोळ कुटुंबीयांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला सुपूर्द केली. गेली 36 वर्ष मोहोळ कुटुंबीयांकडून 'महाराष्ट्र केसरी' विजेत्यासाठी चांदीची गदा बनवून देण्यात येते.महाराष्ट्र केसरीच्या विजेत्याला चांदीची गदा आणि 2 लाख रुपयाचं रोख बक्षीस दिले जात असल्याने ही स्पर्धा अत्यंत चर्चेची ठरते.