
कुस्तीपटूंसाठी मानाच्या असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे (Maharashtra Kesari Kusti) आयोजन यंदा पुण्यामध्ये करण्यात आले आहे. 2 ते 7 जानेवारी दरम्यान या स्पर्धेचं आयोजन बालेवाडीमध्ये करण्यात आलं आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी नागपूर आणि अमरावतीचा संघ जाहीर करण्यात आला आहे. केसरी गटासाठी नागपूरचे प्रतिनिधित्व करण्याची संधी उस्मान खाँ पठाणला मिळाली आहे. ही स्पर्धा गादी आणि माती अशा दोन प्रकारांमध्ये पार पडते. Maharashtra Kesari Kusti: 63व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे पुणे येथे आयोजन; 2 ते 7 जानेवारी मध्ये रंगणार थरार.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी कसा असेल नागपूर संघ ?
गादी विभाग
५७ किलो : अनिकेत हजारे , अभिषेक पोटरुंगे
६१ किलो : महेश काळे, लतेश राठोड
६५ किलो : अमन तिवारी, करण चौहान
७० किलो : चेतन हजारे, रवींद्र बोरधरे
७४ किलो : चेतन घारघाटे
७९ किलो : प्रफुल्ल पारधी, कार्तिक भांडे.
८६ किलो : नुरबादशाह
९२ किलो : प्रशांत जौंजाळ, चैतराम कुंभारे
९७ किलो : कृष्णानंद पांडे
केसरी गट : उस्मान खाँ पठाण.
माती विभाग
५७ किलो : आकाश ठवकर, दुर्गेश ओमकार
६१ किलो : दीपक हनवते, सूरज खटाना
६५ किलो : हिमांशू लांजेवार, ऋषी पारसे
७० किलो : गगन घरजारे, शुभम समुद्रे
७४ किलो : धीरज कूलूरकर, शीवम देशमुख
७९ किलो : संदीप सवळे
८६ किलो : सचिन शिंदे, आशिष चांभारे
९२ किलो : विशाल डाके
९७ किलो : जसवीर काटरपवार
केसरी गट : अजय सोमकुवर
अमरावतीनेदेखील आपला संघ जाहीर केला आहे. यामध्ये 15 जणांचा समावेश आहे. Maharashtra Kesari Kusti 2018: बाला रफिक शेख, महाराष्ट्र केसरी कुस्ती 2018 विजेते, पहा 1961-2018 पर्यंत कोण कोण आहेत विजेते.
माती विभाग
विकी उके
अभिषेक मोडकर
उमेश सुंदरकर
प्रतिक यावले
समीर देशमुख
जितेंद्र डिके
आदिल पहिलवान
कुणाल वाघ
शोएब पहेलवान
गोविंद कपाटे
जावेद पहेलवान
नदीम खान
राहुल बाखडे
धर्मेंद्र डिके
सय्यद शोएब
मामासाहेब मोहोळ यांच्याकडून 1961 पासून या कुस्ती स्पर्धेची सुरुवात करण्यात आली होती . मात्र कुस्तीगीर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मामासाहेब मोहोळ यांचे 1982 साली निधन झाल्यानंतर ही परंपरा मोहोळ कुटुंबीयांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला सुपूर्द केली. गेली 36 वर्ष मोहोळ कुटुंबीयांकडून 'महाराष्ट्र केसरी' विजेत्यासाठी चांदीची गदा बनवून देण्यात येते.महाराष्ट्र केसरीच्या विजेत्याला चांदीची गदा आणि 2 लाख रुपयाचं रोख बक्षीस दिले जात असल्याने ही स्पर्धा अत्यंत चर्चेची ठरते.