From left to right: Manu Bhaker, D Gukesh, Harmanpreet Singh and Praveen Kumar (Photo credit: X @realmanubhaker and @ikamalhaasan, @13harmanpreet and @sachin_rt)

Major Dhyan Chand Khel Ratna Award 2024: भारत सरकार कडून ऑलिंपिक मध्ये दोन पदक विजेती मनू भाकर (Manu Bhaker), चेस वर्ल्ड चॅम्पियन गुकेश डी (Gukesh D), हॉकी टीम कॅप्टन हरमनप्रीत सिंह (Harmanpreet Singh), पॅरालम्पिक गोल्ड मेडलिस्ट (Praveen Kumar) यांना खेलरत्न (Khel Ratna Award) जाहीर केला आहे. याबाबतची माहिती Ministry of Youth Affairs and Sports कडून देण्यात आली आहे. सोबतच 32 जणांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. आज जाहीर झालेल्या या पुरस्काराचा प्रदान सोहळा 17 जानेवारी 2025 दिवशी होणार आहे. दिल्लीत राष्ट्रपती भवनामध्ये सकाळी 11 वाजता एका खास सोहळ्यात हे पुरस्कार दिले जातील.

समितीच्या शिफारशींच्या आधारे आणि योग्य तपासणीनंतर, सरकार कडून खेळाडू, प्रशिक्षक, विद्यापीठे आणि संस्थांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला जातो. यंदा या खेलरत्न अवॉर्ड्स मध्ये क्रिकेटपटूचा समावेश नाही. अर्जुन पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील नेमबाज स्वप्नील सुरेश कुसळे याचा समावेश आहे.

अर्जुन पुरस्कार विजेते 32 खेळाडू

ज्योती येराजी (ॲथलेटिक्स)

अन्नू राणी (ॲथलेटिक्स)

नितू (मुष्टियुद्ध)

स्वीटी (मुष्टियुद्ध)

वंतिका अग्रवाल(बुद्धिबळ)

सलीमा टेटे (हॉकी)

अभिषेक (हॉकी)

संजय (हॉकी)

जरमनप्रीत सिंग (हॉकी)

सुखजीत सिंग (हॉकी)

राकेश कुमार (पॅरा-तिरंदाजी)

प्रीती पाल (पॅरा-ॲथलेटिक्स)

जीवनजी दीप्ती (पॅरा-ॲथलेटिक्स)

अजित सिंग (पॅरा-ॲथलेटिक्स)

सचिन सर्जेराव खिलारी (पॅरा-ॲथलेटिक्स)

धरमबीर (पॅरा-ॲथलेटिक्स)

प्रणव सूरमा (पॅरा-ॲथलेटिक्स)

एच होकातो सेमा (पॅरा-ॲथलेटिक्स)

सिमरन (पॅरा-ॲथलेटिक्स)

नवदीप (पॅरा-ॲथलेटिक्स)

नितेश कुमार (पॅरा-बॅडमिंटन)

तुलसीमाथी मुरुगेसन (पॅरा-बॅडमिंटन)

नित्या सुमथी सिवन (पॅरा-बॅडमिंटन)

मनिषा रामदास (पॅरा-बॅडमिंटन)

कपिल परमार (पॅरा-जुडो)

मोना अग्रवाल (पॅरा-नेमबाजी)

रुबिना फ्रान्सिस (पॅरा- नेमबाजी)

स्वप्नील सुरेश कुसळे (नेमबाजी)

सरबज्योत सिंग (नेमबाजी)

अभय सिंह (स्क्वॅश)

साजन प्रकाश (पोहणे)

अमन (कुस्ती)

खेलरत्न चे मानकरी कोण?

मनू भाकर ने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये आणि त्यानंतर सरबज्योत सिंगसह 10 मीटर मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती भारतातील पहिली खेळाडू ठरली आहे.  (हेही वाचा - Manu Bhaker Wins Bronze: कोण आहे मनू भाकर? जाणून घ्या, पिस्तूलमध्ये बिघाड झाल्यामुळे 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक गमावण्यापासून ते पॅरिसमध्ये कास्यपदक जिंकण्यापर्यंतचा प्रवास).

डी गुकेश हा बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच चेन्नईच्या 18 वर्षांच्या गुकेशने सिंगापूर येथे झालेल्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून विश्वविजेता होण्याचा मान पटकवला. D Gukesh Prize Money: 17 दिवसांत 11 कोटी... विश्वविजेत्याची वयाच्या 18 व्या वर्षी प्रचंड कमाई, नेटवर्थ 20 कोटींच्या पुढे .

हरमनप्रीत सिंहने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 गोल केले, ज्याच्या जोरावर त्याला तिसऱ्यांदा FIH सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार मिळाला. तर प्रवीण कुमार हा उत्तर प्रदेशचा आहे. प्रवीणने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी-T64 स्पर्धेत आशियाई विक्रम मोडून सुवर्णपदक जिंकले होते.