D Gukesh (Photo: @FIDE_chess)

Youngest World Chess Champion In History: भारताचा युवा स्टार डी गुकेश (D Gukesh) बुद्धिबळ विश्वाचा नवा चॅम्पियन बनला आहे. सिंगापूर येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत गुकेशने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून विजेतेपद पटकावले. यासह गुकेश बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे.   या वर्षाच्या सुरुवातीला कँडिडेट्स टूर्नामेंट जिंकल्यानंतर गुकेश हा जागतिक विजेतेपदासाठी आव्हान देणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. गुकेशला वर्ल्ड चॅम्पियन ठरल्यानंतर किती बक्षिसाची रक्कम मिळाली, जाणून घ्या.  (हेही वाचा  - Google Doodle Celebrating Chess: बुद्धिबळाच्या सन्मानार्थ खास गूगल डूडल; चॅम्पियन D Gukesh ठरला निमित्त)

जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप ही क्रीडा जगतात सर्वाधिक बक्षीस रक्कम असलेल्या चॅम्पियनशिपपैकी एक आहे. या चॅम्पियनशिपची बक्षीस रक्कम 2.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच अंदाजे 21 कोटी रुपये आहे.  या विजयानंतर गुकेश भावूक झाला आणि तो आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही. विश्वनाथन आनंद नंतर विश्वविजेता बनणारा दुसरा भारतीय. गुकेश 5 वेळा विश्वविजेता विश्वनाथन आनंदच्या अकादमीत बुद्धिबळाचे प्रशिक्षण घेतो.

विश्वविजेता बनल्यानंतर गुकेशने 11.45 कोटी रुपये जिंकले

डी गुकेशला वर्ल्ड चॅम्पियन बनण्यासाठी 11.45 कोटी रुपये बक्षीस मिळाले, तर डिंग लिरेनला 9.75 कोटी रुपये मिळाले. FIDE च्या नियमांनुसार, फायनल खेळणाऱ्या खेळाडूंना प्रत्येक सामना जिंकण्यासाठी 1.69 कोटी रुपये मिळतात तर उर्वरित रक्कम दोन्ही खेळाडूंमध्ये विभागली जाते. गुकेशने तीन सामने जिंकले. त्याने तिसरा, 11वा आणि 14वा गेम जिंकला. ज्यातून त्याला 5.07 कोटी मिळाले, तर गुकेशला एकूण 11.45 कोटी मिळाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वर्ल्ड चॅम्पियन बनण्यापूर्वी गुकेशची एकूण संपत्ती 8.26 कोटी रुपये होती, जी आता 20 कोटींच्या पुढे गेली आहे. बुद्धिबळातील बक्षिसांची रक्कम आणि जाहिराती हे गुकेशचे उत्पन्नाचे स्रोत आहेत.