भारत-अफगाणिस्तान (Photo Credit: Facebook)

गुरुवारी फिफा (FIFA) 2022 विश्वचषक क्वालिफायर सामन्यात भारत (India) आणि अफगाणिस्तान (Afghanistan) संघातील सामना 1-1 ने ड्रॉ राहिला. भारताने दुसऱ्या हाफमध्ये इंजरी गोल करत सामना ड्रॉ केला. या निकालाचा अर्थ असा की जागतिक क्रमवारीत 106 व्या क्रमांकावर असलेल्या भारता पात्रतेमध्ये अद्याप पहिला विजय मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहे. भारतीय संघ आपल्या दुसर्‍या पराभवाच्या दिशेने प्रगती करीत असताना, सेमिन्लेन डोंगल (Seiminlen Doungel) याने गोल केला. अफगाणिस्तानच्या जेल्फगर नाझरी याने खेळाचा पहिला गोल करत भारताला अडचणीत आणले होते. ग्रुप ईमध्ये भारत अद्याप चौथ्या क्रमांकावर आहे. चार सामन्यात त्यांचे तीन गुण आहेत, तर अफगाणिस्तान चार गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. मध्यवर्ती रिपलब्लिन स्टेडियममध्ये अत्यंत थंड हवामानात हा सामना खेळला गेला.संध्याकाळी तापमान नऊ अंशांपर्यंत गेले होते.तिसर्‍या फेरीपर्यंत पोहोचण्याची भारताची शक्यता कमी आहे.

पहिल्या हाफच्या इंजरी वेळी भारताने एक गोल केला. त्यानंतर दाविद नजम याने एक शानदार खेळी केली आणि त्याने चेंडू नाजरीकडे पाठवला ज्याने भारतीय बचावपटूंकडून चेंडू बचावत गोल केला. मागील सामन्यांच्या कामगिरीवर अफगाणिस्तानने आत्मविश्वास दाखविला. अफगाणिस्तान संघाने पहिल्या हाफमध्ये चांगली कामगिरी बजावत मंदारराव देसाई, आदिल खान, राहुल भेके आणि प्रीतम कोटल यांच्यासह भारतीय बचावाला दडपणाखाली ठेवले.

58 व्या मिनिटाला भारताला संधी होती, पण कर्णधार सुनील छेत्री याच्याकडे प्रीतम कोटल याच्या क्रॉसवर मारलेला हेडर अजीजीने वाचवला. भारताने दोनदा गोल करण्याचा प्रयत्न जेल पण त्यांना कोणतीही स्पष्ट संधी मिळाली नाही. भारतीय खेळाडूंनी गोलची बरोबरी करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले.