Coronavirus Outbreak: जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांनी दिले ऑलिम्पिक खेळ कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलले जाण्याचे संकेत, IOC वर क्रीडा संघटनांचा दबाव
टोकियो ऑलिम्पिक 2020 (Photo Credit: Getty)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) आतापर्यंतचा सर्वात मोठा परिणाम चीन, इटली, स्पेन आणि इराणवर झाला आहे, जिथे बरीच लोकांनी आपला जीव गमावला. परंतु या साथीच्या आजारामुळे जपानवर अद्याप मोठा परिणाम झाला नाही. अशा स्थितीत जपानच्या टोकियो शहरात ऑलिम्पिक खेळ नियमित वेळापत्रकानुसार आयोजन केले जाण्यावर आयओसी ठाम आहे. यावर जपानचे पंतप्रधान शिंजो अबे (Shinzo Abe) सोमवारी प्रथमच म्हणाले की, टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्थगित केले जाऊ शकते. ते म्हणाले की या महामारीमुळे स्पर्धेचे आयोजन पूर्ण स्वरुपात होऊ शकले नाही तर कदाचित टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलण्याची गरज आहे. यापूर्वी जपानचे पंतप्रधान ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यास वचनबद्ध होते आणि ते पुढे ढकलण्याबाबत बोलतही नव्हते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) रविवारी एका तातडीच्या बैठकीनंतर सांगितले की, 24 जुलैपासून ऑलिम्पिकच्या परिदृश्य योजनेवर जोर देत आहे. या योजनांमध्ये संभाव्य स्थगिती देखील समाविष्ट आहे. (Tokyo Olympics 2020: ऑस्ट्रेलिया-कॅनडा देशांनी टोकियो ऑलिम्पिकमधून घेतली माघार)

ते म्हणाले की, आयओसीवरही क्रीडा संघटना आणि इतर अनेक देशांतील खेळाडूंचा दबाव वाढला आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या या वक्तव्यानंतर आता असा विश्वास आहे की टोकियो ऑलिम्पिक त्याच्या ठरलेल्या वेळेपासून सुरू होऊ शकणार नाही. "ऑलिम्पिक रद्द होणार की नाही याबाबत आयओसी अंतिम निर्णय घेईल," असे अबे म्हणाले. ऑलिम्पिक समितीने (आयओसी) रविवारी सांगितले की, कोरोनो व्हायरसच्या दृष्टीने टोकियो ऑलिम्पिकच्या संभाव्य स्थगितीबाबत अंतिम निर्णय चार आठवड्यात घेण्यात येईल. आयओसी अध्यक्ष थॉमस बाच म्हणाले, "ऑलिम्पिक स्थगित किंवा पुढे ढकलण्याबाबत सर्व भागधारकांशी चर्चा सुरू झाली आहे."

खेळ पुढे ढकलण्यासाठी अ‍ॅथलीट्स, फेडरेशन आणि राष्ट्रीय समित्यांच्या तीव्र दबावाखाली, आयओसीने रविवारी टोकियो खेळ ठरल्यानुसार पुढे जाण्याचा आग्रह धरल्याच्या विधानावर रविवारी यू-टर्न घेतले. आयोजकांनी ऑलिम्पिकसाठी पर्यायी तारखांचे आराखडे तयार करण्यास सुरवात केली आहे, अशी माहिती सूत्रांनी रॉयटर्सला दिली. यापूर्वी, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाने या खेळांसाठी आपला संघ पाठवणार नसल्याचे स्पष्ट केले. ऑस्ट्रेलियन ऑलिम्पिकच्या अधिका्यांनी त्यांच्या सर्व खेळाडूंना आता 2021 च्या दृष्टीने ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी करण्यास सांगितले आहे. गेल्या वर्षीच्या शेवटी चीनमध्ये कोरोन व्हायरसचा उद्रेक झाल्यापासून आजवर 13,000 हुन पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून, त्याचे केंद्रबिंदू आता युरोपमध्ये आहे. रविवारी पहाटेपर्यंत जपानमध्ये 37 मृत्यू आणि 1,055 कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत.