Tokyo Olympics 2020: ऑस्ट्रेलिया-कॅनडा देशांनी टोकियो ऑलिम्पिकमधून घेतली माघार, कोरोना व्हायरसचा धोका पाहत खेळाडूंना पाठवण्यास दिला नकार
टोकियो ऑलिम्पिक (Photo Credit: Getty)

टोकियोमध्ये (Tokyo) आयोजित होणारे 2020 खेळ कोरोना व्हायरसच्या पुढे ढकलले गेले नाहीत तर कॅनडा (Canada) आणि ऑस्ट्रेलियाने (Australia) ऑलिम्पिकमधून (Olympics_ माघार घेण्याची तयारी दर्शविली आहे. या धक्कादायक घोषणांनी आयओसीवर (IOC) ऑलिम्पिक खेळ कमीतकमी एक वर्ष पुढे ढकलण्यासाठी दबाव आणखी वाढवला आहे. रविवारी झालेल्या आपत्कालीन बैठकीनंतर आयओसीने पहिल्यांदा 24 जुलैपासून सुरू होणाऱ्या खेळांना स्थगिती देण्याची कबुली दिली. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतून बाहेर पडणारा कॅनडा हा पहिला देश ठरला आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) आजारामुळे खेळ वर्ष पुढे न ढकल्यासदेशातील क्रीडा संस्थाने स्पर्धेतून माघार घेण्याचे सांगितले आहे. रविवारी कॅनेडियन ऑलिम्पिक समिती आणि कॅनेडियन पॅरालंपिक समितीच्या संयुक्त निवेदनात ही बातमी समोर आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही पुढे ढकलण्यामागील मूळ जटिलता ओळखत असताना, आमच्या क्रीडापटूंचे आणि जागतिक समुदायाचे आरोग्य आणि सुरक्षितता यापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही.” (Coronavirus Scare: ऑलिंपिक रद्द होण्यापासून रोखण्यासाठी जपान पुरेसे COVID-19 चाचण्या करत नाही? सायना नेहवाल ने शेअर केली 'धक्कादायक' पोस्ट)

“हे केवळ क्रीडापटूंच्या आरोग्याबद्दल नाही तर ते सार्वजनिक आरोग्याबद्दल आहे. कोविड-19 आणि संबंधित जोखमीमुळे, हे आमच्या एथलीट्ससाठी आणि त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य आणि सुरक्षित नाही.” दुसरीकडे, कॅनडाने घेतलेला पुढाकार पाहून ऑस्ट्रेलियन ऑलिम्पिक समितीने खेळाडूंना टोकियो गेम्सला 12 महिन्यांच्या स्थगितीची तयारी करण्यास सांगितले आहे. खेळ ठरल्याप्रमाणे पुढे गेल्यास बहिष्कार घालण्याची धमकी देण्यास इतर अनेक समित्यांनी देण्यास सुरुवात केली आहे. 24 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान ग्रीष्मकालीन खेळांचे आयोजन 25 ऑगस्ट रोजी पॅरालंपिक खेळांची सुरुवात होणार आहे.

तथापि, आयओसी अध्यक्ष थॉमस बाच म्हणाले की ऑलिम्पिक रद्द होणार नाही आणि त्यामुळे टोकियो 2021 मध्ये स्थानांतरित होण्याची शक्यता कमी दिसत आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी आधीच सरकारच्या सध्याच्या निर्बंधांनुसार ऑस्ट्रेलियन ऑलिम्पियन्सला जुलैमध्ये टोकियोला जाण्याची परवानगी देण्यात येणार नसल्याचे जाहीर केले आहेत. आयओसीने खेळांची तारीख पुढे ढकलण्याची योजना आखण्यासाठी चार आठवड्याची मुदतवाढ दिली आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटना आणि प्रसिद्ध खेळाडूंकडून टोकियो 2020 पुढे ढकलण्यावर सतत दबाव येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड-19मुळे स्थिती सतत बिघडत असल्याने अलीकडील महिन्यांत असंख्य ऑलिम्पिक पात्रता कार्यक्रम पुढे ढकलले किंवा रद्द केले गेले आहेत.