Coronavirus Scare: ऑलिंपिक रद्द होण्यापासून रोखण्यासाठी जपान पुरेसे COVID-19 चाचण्या करत नाही? सायना नेहवाल ने शेअर केली 'धक्कादायक' पोस्ट
सायना नेहवाल (Photo Credit: Getty Images)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर जगभरातील क्रीडा कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली आहे, परंतु टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) 2020 वरही याचे संकट दिसत आहे. क्रिकेट, फुटबॉल, टेनिसपासून अन्य क्रीडा स्पर्धा रद्द किंवा त्यांच्या तारखा पुढे ढकलल्या जात असताना आताऑलिम्पिकही पुढे ढकलले जावे अशी मागणी जगाच्या कान्या-कोपऱ्यातून होत आहे. गुरुवारी, जपानने (Japan) कोरोना व्हायरसच्या पुरेसे चाचण्या केल्या नसल्याचा अहवाल समोर आला आहे. ट्विटरव्हर्सने आगामी ऑलिम्पिक रद्द किंवा पुढे ढकलले जाऊ नये यासाठी हे उपाय म्हणून म्हटले आहे. महिला बॅडमिंटनमध्ये भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला शटलर सायना नेहवाल (Saina Nehwal) ने याला षड्यंत्राला धोकादायक म्हटले आहे. आयोजक हा कार्यक्रम नियोजित वेळेनुसार पार पडेल अशी अपेक्षा बाळगून आहेत, तर शोपीस स्पर्धेत भाग घेणारे जगभरातील खेळाडू आणि क्रीडा संघटनांनी भीती व्यक्त केली आहे. (Coronavirus Pandemic: 124 वर्षांत चौथ्यांदा ऑलिम्पिक होणार रद्द? यापूर्वी 'या' कारणांमुळे रद्द करण्यात आला होता कार्यक्रम)

नुकत्याच ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी लंडनला गेलेल्या सायनाने खेळाडूंच्या आरोग्यापेक्षा आर्थिक लाभाला प्राधान्य दिल्याने अधिकाऱ्यांवर टीका केली होती. कोरोनाव्हायरसचा धोका कमी होईपर्यंत सायना देखील क्रीडा उपक्रमांपासून अंतर ठेवण्याचे समर्थन केले. गुरुवारी, एका चाहत्याने 2020 च्या टोकियो खेळ स्थगित होऊ नये म्हणून जपान त्यांच्या संभाव्यतेनुसार कोरोन व्हायरस चाचण्या न घेण्याची रिपोर्ट शेअर केली तेव्हा सायनानेही सर्वांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन करत पोस्ट शेअर केली.

Corona विषाणूच्या संशयित रुग्णाची दिल्ली येथे आत्महत्या;रुग्णालयाच्या इमारतीतून मारली उडी : Watch Video 

दरम्यान, सोशल मीडियावर समोर आलेल्या जपान टुडेच्या अहवालानुसार, देशात दररोज 7,500 चाचण्या घेण्याची क्षमता आहे परंतु प्रत्यक्षात घेतल्या जाणाऱ्या टेस्ट्सची संख्या दिवसाला 1,190 आहे. जपान मेडिकल असोसिएशनच्या अभ्यासात असे म्हटले आहे की, बुधवारी, डॉक्टरांनी विनंती केलेल्या एकूण 290 कोविड-19 चाचण्या आरोग्य केंद्रांनी नाकारल्या. जपानमध्ये आतापर्यंत 686 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे, तर 29 जणांचा या आजाराने बाली घेतला आहे.