मेजर ध्यानचंद (Photo Credits: Wikimedia Commons)

क्रिकेटमध्ये जो दर्जा सर डोनाल्ड ब्रॅडमन यांना प्राप्त आहे, बॉक्सिंगमध्ये मोहम्मद अली. फुटबॉलमध्ये लिओनेल मेस्सी, पेले यांना प्राप्त आहे, तोच सन्मान भारताचे सुपुत्र मेजर ध्यानचंद (Major Dhyan Chand) यांना प्राप्त आहे. ध्यानचंद हे भारतीय हॉकीतील एक श्रेष्ठ नाव. 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन 2019 म्हणून साजरा केला जातो. हा दिवस देशाचे दिग्गज हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती आहे. ध्यानचंदने ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. आणि यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची ओळख झाली. त्यांच्या सन्मानार्थ, दरवर्षी 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय खेळ दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी दिवशी तरुणांना खेळाबद्दल जागरूक करण्याचे मुख्य कामही केले जाते. मेजर ध्यानचंद यांचे नाव जगातील क्रीडा इतिहासात सुवर्ण अक्षरे लिहिलेले आहे. त्यांनी 1928, 1932 आणि 1936 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीमध्ये तीन ऑलिम्पिक सुवर्णपदके मिळविली आहेत. (फिरोज शहा कोटला स्टेडियम चे नाव बदलून अरुण जेटली स्टेडियम ठेवणार; DDCA ची घोषणा)

मेजर ध्यानचंदचे चेंडूवरचे अफलातून नियंत्रण ही त्यांची कायमच खासियत राहिली. ते त्यांच्या हॉकी स्टिकने खेळाच्या मैदानावर काही जादू करायचे आणि म्हणून त्याला 'हॉकीचे जादूगार' म्हटले जाते. मेजर ध्यानचंद यांच्याशी जुडलेला एक खास किस्सा आहे जो माहिती पडल्यावर ते एक खरे देशभक्त होते हे देखील सिद्ध होते.

मेजर ध्यानचंदच्या जादुई खेळावर प्रभावित होऊन जर्मन हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर (Adolf Hitler) याने त्यांना आपल्या देश जर्मनीकडून खेळण्याची ऑफर दिली पण ध्यानचंद यांनी त्यांची ऑफर नाकारली. बर्लिन ऑलिम्पिक हॉकीचा अंतिम सामना भारत आणि जर्मनी यांच्यात 14 ऑगस्ट 1936 रोजी होणार होता, पण त्यादिवशी सातत्याने होणारा पाऊस पडल्यामुळे दुसर्‍या दिवशी हा सामना 15 ऑगस्ट रोजी खेळविण्यात आला. त्या दिवशी जर्मन हुकूमशहा हिटलरही स्टेडियममध्ये हजर होता. जर्मनीला धूळ चारण्यासाठी ध्यानचंद अनवाणी पायाने खेळले आणि त्यानंतर हिटलरसारखा हुकूमशहासुद्धा त्याचा प्रशंसक झाला. त्यांनी ऑलिम्पिकमध्ये हिटलरसमोर अनेक गोल करत जर्मनीला पराभूत केले. यानंतर हुकूमशहा हिटलरने ध्यानचंद यांना जर्मनीकडून खेळण्याची आणि त्याऐवजी आपल्या सैन्यात उच्च पदाची ऑफर दिली पण ध्यानचंदनी हिटलरचा प्रस्ताव नाकारला. हिटलरने मेजर ध्यानचंद यांना हॉकी जादूगारची पदवी दिली.

मेजर ध्यानचंदने आपल्या हॉकी कारकीर्दीत 400 हून अधिक आंतरराष्ट्रीय गोल केले आहेत. बर्लिन ऑलिम्पिकबद्दल बोलायचे तर ध्यानचंदने या स्पर्धेत एकूण 11 गोल केले होते. तर 1928 च्या अ‍ॅमस्टरडॅम ऑलिम्पिकमध्ये ध्यानचंदने 5 सामन्यांत 14 गोल केले.