फिरोज शहा कोटला स्टेडियम चे नाव बदलून अरुण जेटली स्टेडियम ठेवणार; DDCA ची घोषणा
Feroz Shah Kotla to be Renamed as Arun Jaitley Stadium (Photo Credits: IANS)

नवी दिल्ली (Delhi)  येथील फिरोझ शहा कोटला (Feroz Shah Kotla Stadium) स्टेडियमचे नाव बदलून माजी अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली (Arun Jaitley) यांचे नाव देणार असल्याची घोषणा Delhi and District Cricket Association (DDCA) समितीकडून नुकतीच करण्यात आली आहे. अरुण जेटली यांनी 24 ऑगस्ट रोजी प्रदीर्घ आजारानंतर दिल्लीच्या एम्स (AIIMS)  रुग्णालायत शेवटचा श्वास घेतला. भारतीय राजकारणातील या मोठ्या नेत्याला मानवंदना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 12 सप्टेंबर रोजी अधिकृतरित्या हे नाव बदलण्यात येणार असून तेथील एका स्टँडला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)  याचे नाव देण्यात येणार आहे.दरम्यान, अरुण जेटली यांचे नाव स्टेडियमला देण्यात येणार असले तरी मैदानाचे नाव हे फिरोझ शहा कोटला हेच कायम राहणार असल्याचे सुद्धा DDCA ने स्पष्ट केले आहे.

ANI ट्विट

अरुण जेटली यांनी आपल्या कारकिर्दीतील तब्बल 13 वर्षे या समितीच्या अध्यक्ष पदी काम केले होते, त्यांचे क्रिकेट मधील स्वारस्य जपत त्यांनी दिल्ली येथे क्रिकेट संबंधित व्यवस्थापनात मोठा हातभार लावला होता. 2015 साली त्यांना मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्रालयाची जबाबदारी देण्यात आल्यावर मात्र त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. जे स्टेडियम जेटली यांच्या अध्यक्षतेखाली बांधण्यात आले त्याचे नाव आता जेटली यांच्या नावानेच प्रसिद्ध करत समितीकडून त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे वरिष्ठ पत्रकार व सध्याचे DDCA अध्यक्ष रजत शर्मा यांनी सांगितले. (अरुण जेटली DDCA अध्यक्ष असताना बनले होते खेळाडूंचे संकटमोचक; वीरेंद्र सेहवाग याने श्रद्धांजली वाहत सांगितली आठवण)

दरम्यान, अरुण जेटली हे क्रिकेटविश्वाशी फार जवळून जोडले गेले होते. भारतीय संघातील अनेक खेळाडू जसे की विराट कोहली, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, आशिष नेहरा, रिषभ पंत आणि अन्य अनेकांना त्यांनी पाठिंबा देत पुढे आणले होते. यामुळेच त्यांच्या मृत्यूनंतर या सर्व खेळाडूंनी शोक व्यक्त केला होता. त्यादिवशीच भारत व वेस्ट इंडिज या सामन्यातही टीम इंडिया काळी फित बांधून खेळली होती. याच पार्श्वभूमीवर आज, पूर्व दिल्लीचा खासदार व माजी क्रिकेटर गौतम गंभीर याने यमुना क्रीडाकेंद्राचे नाव बदलून अरुण जेटली क्रीडाकेंद्र ठेवण्याचा प्रस्ताव DDCA कडे मांडला होता.