फाईल फोटो ( photo credit: Getty )

India Vs Australia 1st Test: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने (Australia) 235 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हीस हेड याने 72 धावा केल्या. त्यानंतर मिशेल स्टॉर्कने 15 चेंडूत 27 धावा करत संघाचा खेळ 204 धावांपर्यंत पोहचवला. मात्र भारताच्या जसप्रीत बुमराहने स्टॉर्कची विकेट घेत ऑस्ट्रेलियाला पहिला झटका दिला. दुसऱ्या दिवस अखेर ऑस्ट्रेलिया संघाचा खेळ 7 बाद 191

कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पावसामुळे सामना उशिराने सुरु झाला. नॅथन लियॉनने 24 धावा केल्या आणि हेडच्या सोबतीने 31 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलिया संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मोहम्मद शमी 235 धावांवर हेडला कॅचआऊट केले. त्यानंतर शमीने शेवटची विकेटही घेतली आणि आस्ट्रेलियाचा डाव 235 वर गुंडाळला.

नॅथन लियॉन या डावात नाबाद राहिला. भारतासाठी रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. त्याचबरोबर इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.  भारताने पहिल्या डावात चेतेश्वर पुजाराच्या दमदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 250 धावा केल्या. त्यामुळे पहिल्या धावात भारताला 15 धावांची आघाडी मिळाली आहे.