चेतेश्वर पुजारा (Photo Credit-PTI)

India Vs Australia 1st Test: ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 9 विकेट गमावत 250 धावा केल्या आहेत. एडिले ओवल मैदानावर रंगलेल्या या सामन्यात चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 123 धावांची दमदार खेळी केली. नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय संघासाठी सुरुवात खूप वाईट झाली. 100 धावांचा आकडा गाठण्यापूर्वीच भारताचा अर्धा संघ तंबूत परतला.

पुजाराच्या दमदार खेळीसोबतच रोहित शर्माने (Rohit Sharma) 37 आणि ऋषभ पंत (Rishabh Pant)-रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यांनी 25-25 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, पॅट कमिन्स आणि नॅथन लियॉन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

भारतीय संघाच्या वाईट सुरुवातीमुळे हातातून निसटत असलेला डाव चेतेश्वर पुजाराच्या शतकाने सावरला.