India vs Australia, 1st Test:भारताची पडझड, आर्धा संघ तंबूत परतला
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताची सुमार कामगिरी | (Photo Credit-Twitter)

India vs Australia, 1st Test: भारत ( India) आणि ऑस्ट्रिलाय (Australia) यांच्यात सुरु असलेल्या 4थ्या टेस्ट सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना (1st Test) खेळला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय संघाच्या अवसानघातकी खेळीमुळे हा निर्णय फसल्याचे सामना सुरु झाल्यावर काहीच मिनिटांत पाहायला मिळाले. भारीतय संघाची सुरवातच वाईट झाली. अवग्या १९ धावांवर भारताचे 3 गडी बाद झाले. एल राहुल, मुरली विजय आणि विराट कोहील यांच्या रुपात भारताला पहिले तीन धक्के बसले. हे तिघेही अनुक्रमे 2, 11, 10 धावा काढून बाद झाले. संघाचा उप कर्णधार अजिंक्य रहाणे यालाही विशेष अशी कामगिरी दाखवता आली नाही.

आतापर्यंतचा इतिहास पाहता भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियात कधीच जिंकला नाही. केवळ भारतच नव्हे तर, कोणत्याही एशियायी संघाने ऑस्ट्रेलियात सामना जिंकला नाही. 2009 नंतर भारताने वेस्टइंडिजशिवाय विदेशात एकही मालिका जिंकली नाही. या वेळी भारताला इतिहास बदलण्याची संधी होती. पण, भारतीय फलंदाजांनी त्याचे मातेरे केल्याचेच चित्र सध्या दिसत आहे. (हेही वाचा, पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर)

भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, के.एल. राहुल, एम. विजय, सी. पुजारा, रोहित शर्मा, हनुमा विहारी, आर. पंत (विकेटकिपर), आर अश्विन, एम. शामी, आय शर्मा, जसप्रित बुमरा

ऑस्ट्रेलिया संघ

टीम पेन (कर्णधार), मार्कस हॅरिस, अॅरोन फिंच, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हॅण्ड्सकोम्ब, ट्रॅव्हीस हेड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.