India Vs Australia Test Series: पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर
Virat Kohli and Tim Paine (Photo Credits: Twitter)

India Vs Australia Test Series: भारत (India) विरूद्ध ऑस्ट्रेलिया (Australia) कसोटी मालिकेला (Test Series) गुरुवारपासून सुरुवात होईल. उद्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध रंगणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघाची (Indian Cricket Team) घोषणा केली आहे. तर ऑस्ट्रेलियानेही या सामन्यासाठी आपली टीम घोषित केली आहे.

या कसोटी मालिकेत रोहित शर्माला (Rohit Sharma) स्थान देण्यात आले आहे. यापूर्वी झालेल्या इंग्लंड आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहित शर्मा संघाबाहेर होता. मात्र दमदार कामगिरीच्या जोरावर त्याने आपले संघातील स्थान पक्के केले आहे. पृर्थ्वी शॉ ला दुखापत झाल्यामुळे मुरली विजयला समालीची संधी दिली जावू शकेल.

असे असतील दोन्ही संघ-

भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, के.एल. राहुल, एम. विजय, सी. पुजारा, रोहित शर्मा, हनुमा विहारी, आर. पंत (विकेटकिपर), आर अश्विन, एम. शामी, आय शर्मा, जसप्रित बुमरा

ऑस्ट्रेलिया संघ

टीम पेन (कर्णधार), मार्कस हॅरिस, अॅरोन फिंच, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हॅण्ड्सकोम्ब, ट्रॅव्हीस हेड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.