India VS Australia Test Series: दुखापतग्रस्त Prithvi Shaw पहिल्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामना मधून बाहेर

lateral ligament injury ने दुखापतग्रस्त Prithvi Shaw पहिल्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामना मधून बाहेर

India VS Australia Test Series:  दुखापतग्रस्त Prithvi Shaw पहिल्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामना मधून बाहेर
Prithvi Shaw | Indian Cricket Team | (Photo Credits: Getty Images)

India VS Australia Test Series: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याला सुरूवात होण्यापूर्वीच भारतीय संघाला (Indian Cricket Team)  एक मोठा धक्का बसला आहे. कॅच पकडण्याच्या प्रयत्नामध्ये गंभीर दुखापत झाल्याने सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw)  याला संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे. BCCI ने या वृत्ताची अधिकृत माहिती ट्विटरच्या माध्यमातून शेअर केली आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये 6 डिसेंबरपासून पहिला कसोटी समाना सुरू होणार आहे. दरम्यान भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये काही अभ्यास मॅच खेळत आहेत. सिडनी  मैदानावर क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेवनविरुद्ध (Cricket Australia XI) सुरु असलेल्या सराव सामन्याच्या (CAXI vs IND, 4-day Practice Match) तिसऱ्या दिवशी पृथ्वी शॉ ला दुखापत झाली.  मॅचदरम्यान मैदानावर कॅच पकडण्याच्या प्रयत्नामध्ये पृथ्वी शॉ ला गंभीर दुखापत झाली. आज सकाळी तात्काळ हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले. स्कॅनिंग दरम्यान lateral ligament injury झाल्याचे निदान करण्यात आले आहे.

दुखापतग्रस्त पृथ्वी शॉ पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. मात्र तो लवकरच या दुखण्यातून बाहेर पडेल आणि फीट होईल असा आशावाद BCCI ने व्यक्त केला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 30, 2018 11:22 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).