India Vs Australia 1st Test: दुसऱ्या दिवस अखेर ऑस्ट्रेलिया संघाचा खेळ 7 बाद 191
India Vs Australia Test Match (Photo credits: ANI)

India Vs Australia 1st Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना सध्या ऍडलेड (Adelaide) येथे सुरु आहे. या कसोटीच्या दुसऱ्या दिवस अखेर ऑस्ट्रेलिया संघाचा खेळ 7 बाद 191 असा आहे. ऑस्ट्रेलिया संघाची रखडत सुरुवात पाहता भारताला मोठी आघाडी घेता येईल असे वाटत होते मात्र ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेड (Travis Head) या खेळाडूने दमदार फालंदाजी केली.

भारताकडून इशांत शर्मा (Ishant Sharma)  आणि आर आश्विन(Ravichandran Ashwin)या खेळाडूंचा उत्तम खेळ भारताला फायदेशीर ठरला. आर अश्विनने सर्वाधिक म्हणजे ३ विकेट्स घेतल्या आहेत तर इशांत शर्माने ऍरॉन फिंचला शून्यावर आऊट करत धक्का दिला आहे.

पहिल्या डावात भारताने सर्वबाद २५० धावा केल्या. त्यानंतर उत्तम खेळ करून मोठी आघाडी घेण्याच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाचे फलंदाज मैदानावर आले.