रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि के.एल राहुल (KL Rahul) च्या जोडीने ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) येथे होत असलेल्या विश्वचषक सामन्यात  भारतासाठी पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध  सर्वोच्च ओपनिंग भागीदारीचा विक्रम नोंदवला आहे. हा विक्रम 23 वर्षांपासून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि नवजोत सिंघ सिद्धू (Navjot Singh Sidhu) च्या नवे होता. सचिन आणि सिद्धूच्या जोडीने 1996 विश्वकप मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यादरम्यान पहिल्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली होती. आणि आता तब्बल २३ वर्षांनी हा विक्रम रोहित आणि राहुलच्या जोडीने मोडीत काढला आहे. (IND vs PAK, ICC World Cup 2019: रोहित शर्मा पाठोपाठ के एल राहुलच ही धमाकेदार अर्धशतक)

यांच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात रोहित-राहुल च्या जोडी ने पहिल्या विकेटसाठी 136 धावांची भागीदारी केली. वर्ल्ड कप स्पर्धेतील ही भारतीय सलामीवीरांनी केलेली आठवी शतकी भागीदारी आहे. पाकिस्तानविरुद्ध प्रथमच त्यांना अशी कामगिरी करता आली.  राहुल हा शिखर धावांच्या ऐवजी रोहित शर्मा सह सलामीला आला होता.

क्रिकेट विश्वकपमध्ये सगळ्या जगाचं लक्ष असतं ते भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या सामन्यावर. आजवर विश्वकपच्या इतिहासामध्ये आतापर्यंत पाकिस्तानने भारताचा एकदाही पराभव केलेला नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्व कपमध्ये ६ मॅच झाल्या आहेत. यातल्या सगळ्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला.