वर्ल्ड कपच्या सगळ्यात महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या भारत (India)-पाकिस्तान (Pakistan) मॅचला सुरुवात झाली आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली आहे. भारतीय संघाने आपलं शतक पूर्ण केला असून सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) ने ही अर्ध-शतक ठोकले आहे. मात्र, आता रोहित पाठोपाठ के. एल राहुल (KL Rahul) ने हि आपले अर्ध-शतक पूर्ण केलेले आहे. राहुल हा शिखर धवनच्या जागी रोहित शर्मा सोबत सलामीला आला होता.
मॅचमध्ये पाकिस्तानने टॉस जिंकून पहिले क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय संघाने या सामन्यामध्ये एक बदल केला आहे. दुखापतग्रस्त शिखर धवनऐवजी अष्टपैलू विजय शंकरला संधी देण्यात आली आहे.
आतापर्यंत विश्वकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात ६ सामने झाले आहेत. यातल्या सगळ्यामध्ये भारताचा विजय झाला आहे. 1992, 1996, 1999, 2003, 2011 आणि 2015 या विश्वकपमध्ये भारत-पाकिस्तान एकमेकांना भिडले होते.