दुखापतग्रस्त शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) जागी भारतीय संघात (Team India) रिषभ पंत (Rishab Pant) इंग्लंडला (England) जाण्यास सज्ज आहे. IANS शी बोलताना सूत्रांनी सांगितले कि, पंतला ह्या बाबत माहिती दिली गेलेली आहे आणि तो लवकरच इंग्लंडला रवाना होईल. BCCI लवकरच ह्याबाबत अधिकृत घोषणा करेल. (ICC World Cup 2019 मधून दुखापतग्रस्त शिखर धवन बाहेर पडला तरी इंग्लंडमध्येच राहणार; BCCI ची माहिती)

पंत भारतीय संघात धवनच्या जागी जाणार आहे. ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्धच्या सामन्यादरम्यान धवनला बोटाला दुखापत झालेली ज्यामुळे तो आता ३ आठवडे भारतीय संघात खेळताना दिसणार नाही. मात्र धवन इंग्लंडमध्येच राहून बोर्डची मेडिकल टीम त्याच्यावर उपचार करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

विश्वचषकाच्या भारतीय संघाच्या दुसर्‍या साखळी सामन्यात शिखर धवनने 117 धा वा करत ऑस्ट्रेलियाला 253 रन्सच आव्हान देण्यात मोठा वाटा उचलला होता. भारताने या सामन्यात 36 धावांनी ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. शिखर या सामन्याचा 'मॅन ऑफ द मॅच'देखील ठरला. आता भारताचा पुुढील सामना 13 जून दिवशी न्युझिलंड संघाविरूद्ध होणार आहे.