ICC World Cup 2019 मधून दुखापतग्रस्त शिखर धवन बाहेर पडला तरी इंग्लंडमध्येच राहणार; BCCI ची माहिती
File Image of Shikhar Dhawan (Photo Credits: Getty)

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक 2019 च्या साखळी सामन्यात सध्या भारतीय क्रिकेट संघ दमदार कामगिरी करत आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात शिखर धवनने दणदणीत शतक ठोकत भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरण्याचा मान मिळवला. मात्र या खेळादरम्यानच तो दुखापतग्रस्त झाल्याची माहिती आज समोर आली आहे. मात्र असं असूनही त्याच्यावर इंग्लंडमध्येच बीसीसीआयची मेडिकल टीम उपचार करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

शिखर धवनच्या डाव्या हाताच्या मागच्या बाजूला दुखापत झाली आहे. अंगठा आणि तर्जनीच्या मधल्या भागात इजा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध धडाकेबाज कामगिरी करताना हा त्रास त्याला झाला त्यामुळे पुढील सामन्यांना तो मुकणार आहे. परंतू त्याच्याऐवजी संघात कोण टॉप 4 फलंदाज असतील याची आता उत्सुकता वाढली आहे. हे 3 Players करू शकतात दुखापतग्रस्त शिखर धवन ला भारतीय संघात Replace

ANI Tweet

विश्वचषकाच्या भारतीय संघाच्या दुसर्‍या साखळी सामन्यात शिखर धवनने 117 धा वा करत ऑस्ट्रेलियाला 253 रन्सच आव्हान देण्यात मोठा वाटा उचलला होता. भारताने या सामन्यात 36 धावांनी ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. शिखर या सामन्याचा 'मॅन ऑफ द मॅच'देखील ठरला. आता भारताचा पुुढील सामना 13 जून दिवशी न्युझिलंड संघाविरूद्ध होणार आहे.