रवींद्र जडेजा (Photo Credit: @indiancricketteam/Instagram)

21 व्या शतकातील देशाचा ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर’ (MCP) म्हणून विस्डेनने (Wisden) भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्या नावाची घोषणा केली. जडेजाने त्याच्या संघात बॉल, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात केलेले योगदान लक्षणीय आहेत. त्याच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी विस्डेनने क्रिकेटमधील विस्तृत विश्लेषण साधन CricVizचा वापर केला. जडेजाचे एमव्हीपी रेटिंग 97.3 होते, जे श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरननंतर (Muttiah Muralitharan) दुसर्‍या क्रमांकावर होते आणि त्यामुळे तो 21 वे शतकातील दुसर्‍या क्रमांकाचा कसोटीपटू ठरला. “भारताचा प्रथम क्रमांकाचा फिरकी गोलंदाज अष्टपैलू रवींद्र जडेजा पाहणे आश्चर्य वाटत असेल. तरीही त्याची नेहमीच त्यांच्या कसोटी संघात आपोआप निवड होत नाही. तथापि, जेव्हा तो खेळतो तेव्हा त्याला फ्रंटलाइन गोलंदाज म्हणून निवडले जाते आणि 6 व्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे,” क्रिक्झिझच्या फ्रेडी विल्डे यांनी विस्डेनला सांगितले. शेन वॉर्नपेक्षा जडेजाची गोलंदाजीची सरासरी 24.62 आहे तर फलंदाजीची सरासरी शेन वॉटसनपेक्षा 35.26 ने चांगली आहे. (राहुल द्रविडने सचिन तेंडुलकरला केले पराभूत, विस्डेन इंडिया पोलमध्ये ठरला 50 वर्षातील भारताचा महान कसोटी फलंदाज)

2009मध्ये भारतडकून पदार्पण करणाऱ्या जडेजाने भारताकडून 49 कसोटी, 165 एकदिवसीय आणि 49 टी-20 सामने खेळले आहेत. 49 कसोटी सामन्यात 1869 धावा करण्याशिवाय त्याने 213 गडी बाद आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी सर्वात कमी सामन्यांमध्ये 200 गडी बाद करणारा जडेजा सर्वात जलद डावखुरा गोलंदाज ठरला. त्याने 44 व्या सामन्यात 200 वी कसोटी विकेट मिळवली. सर्वात कमी सामन्यात 200 विकेट घेणारा जडेजा रविचंद्रन अश्विननंतर भारताचा दुसरा गोलंदाज आहे. त्याने अवघ्या 37 कसोटीत 200 गडी बाद केले होते.

दुसरीकडे, सध्या जडेजाच्या फील्डिंगची आज जगभरात प्रशंसा होत आहे. लॉकडाऊन दरम्यान अनेक क्रिकेटपटूने त्याला सध्या जगातील सर्वोत्कृष्ट फील्डर मानले. जडेजाने अनेकवेळा आपल्या भव्य क्षेत्ररक्षणातून केवळ चाहतेच नव्हे तर मोठ्या क्रिकेटपटूंनाही आश्चर्यचकित केले आहे. गौतम गंभीर, जॉन्टी रोड्स, विराट कोहली, ब्रॅड हॉग, स्टिव्ह स्मिथ यांनी जडेजाच्या क्षेत्ररक्षणाचे कौतुक केले आहे.